आलेश्वर येथे बुधवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन; गरजूंनी लाभ घेण्याचे फारूक मुलानी यांचे आवाहन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- ‘चला निरोगी धारा शिव घडवूया’ या सामाजिक संकल्पनेतून तसेच जनसेवे चा वारसा जपत तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ (न वी मुंबई) यांच्या वतीने आलेश्वर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  • बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय, आलेश्वर (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे हे शिबिर पार पडणार आहे.
  • ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरो ग्यसेवा उपलब्ध व्हावी, आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशा ने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या शिबिरात नवी मुंबईतील नेरूळ येथील तेरणा  स्पेशा लिटी हॉस्पिटलमधील अनुभवी व नामांकित तज्ज्ञ डॉक्ट रांच्या पथकाकडून रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी क रण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार मोफत औषधोप चारही केले जाणार आहेत.
  • विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन
  • या आरोग्य शिबिरामध्ये हृदयविकार, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग तसेच पोटाच्या विविध विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.
  • त्यामुळे परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
  • विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या श हरांमध्ये जाऊन महागडे उपचार घेणे अनेकदा आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही.
  • नागरिकांसाठी हे शिबिर निश्चितच उपयुक्त ठरणार असून, आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून घेण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे.
  • गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा
  • या शिबिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तपा सणी दरम्यान ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास येईल, अशा पात्र रुग्णांवर नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
  • तसेच, काही रुग्णांचे उपचार किंवा शस्त्रक्रिया तेरणा  हाॅ स्पिटलमधे करणे शक्य नसल्यास अशा रुग्णांसाठी मुंबई तील जे.जे.रुग्णालय आणि के.ई.एम. रुग्णालय यांसार ख्या नामांकित रुग्णालयांमध्ये पुढील उपचार व शस्त्रक्रि येची व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे.
  • गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनाही योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
  • शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे
  • या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्यासोबत खालील कागदपत्रे मूळ स्वरू पात आणणे आवश्यक आहे.
  • १. रेशन कार्ड
  • २. आधार कार्ड
  • ३. आयुष्मान भारत कार्ड
  • ४. पॅन कार्ड
  • नागरिकांनी वरील सर्व कागदपत्रे सोबत आणून शिबिरात सहभागी व्हावे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
  • परिसरातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
  • आलेश्वर व परिसरातील तसेच परंडा तालुक्यातील जास्ती त जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरात सहभागी होऊन या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा.
  • विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा.
  • नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहून स्वतःची व कुटुंबीयांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन फारू क मुलानी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • शिबिराचा तपशील :
  • दिनांक : बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५
  • स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, आलेश्वर, ता. परंडा, जि. धाराशिव
  • सेवा : मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व नियमानु सार शस्त्रक्रियेची सुविधा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles