दुष्काळाच्या झळा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना; फुलांना कवडीमोल भाव, बळीराजा आर्थिक संकटात…!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दुष्काळी परिस्थिती चा फटका शेतीला बसत असतानाच झेंडू उत्पादक शेतक री आर्थिक संकटात सापडले आहेत.
  • झेंडूच्या फुलांना यंदा अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेत कऱ्यांची चिंता वाढली आहे.
  • गेल्या वर्षी झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो १०० रुपये भाव मिळत होता; मात्र यंदा हा भाव घसरून अवघ्या ५० रुप यांवर आला आहे. त्यामुळे शेतीसाठी केलेला खर्च तरी निघणार कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
  • झेंडू लागवडीसाठी बियाणे, रोपे, खते, औषधांची फवार णी, मजुरी आणि पाणी यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो.
  • त्यातच दुष्काळामुळे पाण्याची टंचाई आणि वाढता उत्पा दन खर्च यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत.
  • अशा परिस्थितीत फुलांना कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
  • मोठ्या कष्टाने फुलविलेल्या झेंडूच्या फुलांना योग्य दर मि ळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न पडत.
  • बाजारभावातील घसरण आणि वाढता खर्च यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
  • शेतीत रात्रंदिवस मेहनत करूनही खर्च वसूल होण्याची शाश्वती नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.
  • झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा,तसे च अडचणीच्या काळात शासनाने मदतीचा हात द्यावा, अ शी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles