
माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. ४ शाळेला पंख्यांची भेट..! मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जिल्हा परिषद प्रा थमिक शाळा रायपाटण नं. ४, टक्केवाडी या शाळेतील मुं बईस्थित माजी विद्यार्थी श्री.प्रवीण चंद्रकांत शेट्ये, श्री.उमे श दशरथ शेट्ये आणि श्री.अक्षय चंद्रकांत कोळवणकर यांनी आपल्या मातृशाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त क रत दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी शाळेला एक सिलिंग फॅन आणि एक टेबल फॅन भेटस्वरूपात दिला.

- शिक्षण घेतलेल्या शाळेबद्दल प्रेम आणि जिव्हाळा जपत माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या भेटीमुळे शाळेच्या सुविधां मध्ये भर पडली आहे.
- माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृशाळेच्या विकासासाठी पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या या उपक्रमातून शाळा आणि माजी विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले आहे.
- या योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्या पक यांनी श्री.प्रवीण शेट्ये,श्री.उमेश शेट्ये आणि श्री. अक्ष य कोळवणकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
- तसेच भविष्यातही माजी विद्यार्थ्यांचे शाळेला असेच सह कार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






