
पार्ल्याच्या आंबेवाडी पब्लिक ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसविण्याची अजित गोरुले यांची मागणी.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- आंबेवाडी पब्लिक ब्रि ज ओलांडून हायवे रोज सोसायटीच्या बाजूने विलेपार्ले त सेच अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितते चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या हायवे रोज सोसायटीज वळील सर्व्हिस रोडवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासा ठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजि क कार्यकर्ते श्री.अजित सीता गंगाराम गोरुले यांनी केली आहे.

- आंबेवाडी पब्लिक ब्रिजचा वापर करून या परिसरातून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला तसेच इतर पादचाऱ्यांना सर्व्हिस रोडवरून जाता ना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- या मार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने वेळी च उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गोरुले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
- या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करावी, रस्त्यावरील वाहतुकीचा वेग आणि पादचाऱ्यांची वर्दळ लक्षात घेऊन नियमानुसार गतिरोधक बसवावेत, तसेच सावकाश वाहन चालविण्याचे सूचना फलक आणि पाद चारी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांनाही देण्यात आली आहे.
- प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकां च्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन अजित गोरुले यांनी केले आहे.
- नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संभाव्य अपघा त टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, ही च या निवेदनामागील प्रमुख भूमिका आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






