जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सोनारी प्रशालेची श्रावणी साळुंखे जिल्ह्यात पहिली…! शाळा आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने जंगी सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- सोनारी (ता. परंडा) येथील जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थिनी कु. श्रावणी विलास साळुंखे हिने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्ह्या त प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
  • तिच्या या ऐतिहासिक यशामुळे सोनारी गावासह संपूर्ण परंडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
  • जिल्हा परिषद प्रशाला सोनारी येथे ‘मी असे पाणी वाचव ले’ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्रावणी साळुंखे हिने आप ल्या उत्कृष्ट आणि प्रभावी लेखनाच्या जोरावर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.
  • श्रावणीने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे कौतु क करण्यासाठी आणि तिला पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी सोनारी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शाळा प्रशासन व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने एका जंगी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते कु. श्रावणी हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर गौरव करण्यात आला.
  • श्रावणीच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अ ध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे मनापासून अभिनं दन केले असून तिला भावी शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
  • या घवघवीत यशामुळे सध्या संपूर्ण परंडा परिसरातून आणि सर्व स्तरांतून श्रावणीवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles