
रेशन पुरवठा वेळेवर करा आणि १२ वर्षांवरील महिलांना ‘स्मार्ट कार्ड’ची सक्ती बंद करा; संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे मानधन दर महिन्याला वेळेवर द्या; माहिती अधिकार काकिरर्ते अक्रमक.
- प्रतिनिधी : फारुक शेख :- परंडा तालुका, शहर आणि ग्रामीण भागात यंदा पावसाअभावी खरीप व रब्बी दोन्ही पिके वाया गेल्याने अत्यंत भीषण दुष्काळी परिस्थिती नि र्माण झाली आहे.
- या संकटामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नाग रिकांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे.
- या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील जनतेला तातडीने दिलासा मिळावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, ता लुका -परंडा यांच्या वतीने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, परिवह न मंत्री, जिल्हाधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाला विविध मागण्यांचे जाहीर निवेदन देण्यात आले आहे.

- प्रशासनाने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.
- महासंघाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
- कर व वीज बिल सरसकट माफ करा: तालुक्यातील नाग रिकांचे घरगुती व शेतीचे वीज बिल, नळपट्टी (पाणी पट्टी) आणि घरपट्टी तात्काळ व सरसकट माफ करण्यात यावी.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी: आर्थिक टंचाईमुळे पा लकांना पाल्यांचे शिक्षण देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शालेय मुला-मुलींचे शैक्षणिक शुल्क व इतर सर्व फी सर सकट माफ करावी.
- मायक्रो फायनान्सची सक्तीची वसुली थांबवा:
- काम नसतानाही खाजगी फायनान्स बँका, मायक्रोफायना न्स कंपन्या आणि बचत गटांकडून ग्रामीण भागात कर्ज वसुलीसाठी जुलमी सक्ती केली जात आहे.
- यामुळे महिला व नागरिक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. प्रशासनाने ही वसुली तात्काळ थांबविण्याचे कड क आदेश द्यावेत.
- स्मार्ट कार्डची सक्ती बंद करा:
- एसटी महामंडळ व इतर शासकीय योजनांतर्गत १२ वर्षां वरील महिला व मुलींना प्रवासासाठी किंवा सवलतींसाठी केली जाणारी ‘स्मार्ट कार्ड’ ची सक्ती तातडीने बंद करण्या त यावी.
- रेशन व मानधन वेळेवर द्या:
- गरीब कुटुंबांना रेशनचे धान्य दर महिन्याला वेळेवर मिळा वे. तसेच संजय गांधी निराधार योजना, अपंग, विधवा व श्रावण बाळ योजनेचे मानधन प्रत्येक महिन्याला नियमित पणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे.
- निसर्गाच्या आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटात सापडले ल्या परंडा तालुक्यातील जनतेचा प्रशासनाने सहानुभूती पूर्वक विचार करावा, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
- मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ रस्त्याव र उतरून तीव्र आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा निवेद नात देण्यात आला आहे.
- या निवेदनावर महासंघाच्या परंडा तालुक्यातील प्रमुख प दाधिकारी व सदस्यांच्या खालील प्रमाने फारूक शेख विजय मेहेर जमिर शिकलकर समीर ओव्हाळ आयूब जि नेरी फारूक मुलानी अमित अगरकर कानिफनाथ सूरपने शिवाजी करळे धनजय गोफने रावसाहेब गायकवाड सादि क शेख इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






