
दुष्काळाच्या सावटात बळीराजाची दिवाळी गोड…! कुंभेफळ येथील ‘बाबा दूध संकलन केंद्रा’कडून दूध उत्पादकांना फराळ कीटचे वाटप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दीपावलीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कुंभेफळ (ता. परंडा) येथील ‘बाबा दूध संकलन व शितकरण केंद्र’ यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी फराळ कीटचे अत्यंत उत्साहात वाट प करण्यात आले.
- सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेता, दु ग्ध व्यवसायात अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाची दि वाळी आनंदात जावी या सामाजिक भावनेतून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- या उपक्रमामुळे कुंभेफळ आणि परिसरातील शेतकरी व दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
- या स्तुत्य उपक्रमांतर्गत कुंभेफळसह साकत, पिंपरखेड आणि पालपिंपळा या गावांमधील शेतकरी व दूध उत्पाद कांना दिवाळी फराळाच्या दर्जेदार साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
- सुखी समृद्धीसाठी आणि अभ्यंगस्नानाचे महत्त्व जपत या विशेष कीटमध्ये पुढीलप्रमाणे गृहोपयोगी व फराळाच्या साहित्याचा समावेश करण्यात आला होता:
- • गरा: २ किलो
- • साखर: २ किलो
- • मैदा: १ किलो
- • मिठाई: अर्धा किलो
- • सोनपापडी: पाव किलो
- • मोती साबण (दिवाळी अभ्यंगस्नानासाठी)
- • सुगंधी उटणे
- मान्यवरांची उपस्थिती:
- या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन सिद्धीक शेख आणि मुस्ताक शेख प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते उपस्थित शेतकऱ्यांना या फराळ कीटचे अत्यंत उत्साही वातावरणात वाटप करण्यात आले.
- याप्रसंगी कुंभेफळ व परिसरातील मोठ्या संख्येने दूध उ त्पादक शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिक उप स्थित होते.

- चालू वर्षातील दुष्काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहत संस्थेने राबवलेल्या या शेतकरीभिमुख व कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून ‘बाबा दूध संक लन केंद्रा’चे आणि व्यवस्थापनाचे भरभरून कौतुक व आ भार मानले जात आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






