
पंढरपूर आगारात एसटीच्या चालक-वाहक बांधवांसाठी ‘अभ्यंग स्नान’ उपक्रम संपन्न; दिवाळीत घरट्यापासून दूर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य.
- प्रतिनीधी : पंढरपूर : योगेश सुळे :- दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आप्तांसोबत एकत्र येण्याचा सण. मात्र, आपल्या प्रवाशांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहो चवण्यासाठी अहोरात्र सेवा देणारे एसटीचे चालक-वाहक बांधव अनेकदा दिवाळीच्या दिवशीही घरापासून आणि कुटुंबापासून दूर असतात.
- हाच दुराव्याचा क्षण थोडा सुसह्य व्हावा आणि त्यांनाही दिवाळीचा सण आपल्या सहकाऱ्यांसोबत उत्साहात अनु भवता यावा, यासाठी पंढरपूर एसटी आगाराच्या वतीने एक अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवण्या त आला.

- दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पंढरपूर आगारात इतर ठि काणाहून मुक्कामाला आलेल्या चालक-वाहक बांधवांसा ठी ‘अभ्यंग स्नाना’ची विशेष सोय करण्यात आली होती.
- कुटुंबासारखे वातावरण आणि आनंदाचा क्षण
- पंढरपूर आगारात विविध ठिकाणांहून आलेल्या एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी आगाराच्या वतीने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- सणाच्या दिवशी घरट्यापासून दूर असताना आगारातच घरच्यासारखी आपुलकी मिळाल्याने उपस्थित कर्मचाऱ्यां च्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व समाधान पाहायला मिळाले.
- सर्वांनी मनापासून या उपक्रमाबद्दल आनंद व कृतज्ञता व्यक्त केली.
- मान्यवरांची विशेष उपस्थिती
- या आनंदोत्सवात आणि उपक्रमात पंढरपूर आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहून कर्मचाऱ्यां च्या या सणाला अधिक गोड केले.
- यावेळी आगार व्यवस्थापक श्री.योगेशजी लिंगायत, ATS श्री. तोंडे, ATI बापू बुरुंगले, माऊली शिंदे यांच्यासह पंढर पूर आगारातील सर्व आधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
- सर्व मान्यवरांनी उपस्थित चालक-वाहक बांधवांना दिवा ळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले.
- एस.टीच्या ड्युटीमुळे सणातही कर्तव्याला प्राधान्य देणा ऱ्या या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा हा उपक्रम पंढरपूर आगारात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






