
येडशीत भीषण अग्नितांडव: एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून व गुदमरून मृत्यू; दिवाळीच्या रात्री काळाचा घाला;येडशी आग्नदुर्घटनची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करा : आ.डॉ.प्रतापसिंह पाटील
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-धाराशिव जिल्ह्याती ल येडशी येथे दिवाळीच्या सणादरम्यान काळीज पिळवटू न टाकणारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
- रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका किराणा दुका नाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तब्ब ल सहा जणांचा मृत्यू झाला.
- या अग्नितांडवात संपूर्ण करंडे कुटुंब उद्ध्वस्त झाले असू न, ऐन दिवाळीच्या आनंदावर दुःखाचे मोठे सावट पसरले आहे.

- मृतांमध्ये उत्तम त्रिंबक करंडे,चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, चिमुकली गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे यांचा समावेश झाला आहे.
- दुर्घटनेत कुटुंबातील कृष्णा नावाची व्यक्ती असून, तिच्याव र रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- मध्यरात्री आगीचे रौद्ररूप
- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, येडशी येथील गोविंद भाऊ करंडे आणि उत्तम करंडे यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानाच्या वरच्या मजल्यावरच करंडे कुटुंब वास्तव्या स होते.
- सर्वजण गाढ झोपेत असताना ही आग लागल्याने, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातील साहि त्यासह वरच्या मजल्यावरील घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

- या दुर्घटनेत घरात अडकलेल्या सात जणांपैकी दोघांचा होरपळून, तर चौघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
- घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहून धाराशिव, कळंब आणि तुळजापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
- आग आटोक्यात आणण्यासाठी आणि घरात अडकलेल्यां ना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

- मात्र, तोपर्यंत सहा जणांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला होता. ही आग घरात लावलेल्या पणतीमुळे लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
- लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव
- या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच खासदार ओम
- राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार कैलास पाटील यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेतली.
- त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रशासकीय अधिका ऱ्यांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली व करंडे परि वाराला धीर दिला.
- बाजारपेठ बंद; येडशी गावावर शोककळा
- ऐन दिवाळीच्या सणात एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

- करंडे कुटुंबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी व दुःख व्यक्त करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज येडशीची संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवली.
- सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता येडशी येथी ल सार्वजनिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावर णात सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






