येडशी येथील अग्नितांडवानंतर खाजदार ओमराजे निंबाळकर आक्रमक; धाराशिवसाठी ४ अग्निशमन वाहने देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तातडीने मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा फारूक शेख :- येडशी(ता. धाराशिव) येथे रविवारी रात्री किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत सहा निष्पाप नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्या ची अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली.
  • या पार्श्वभूमीवर धाराशिव मतदारसंघाचे आमदार ओमप्र काश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी आक्रम क भूमिका घेतली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नग रविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाराशिव नगरपा   तातडीने चार नवीन अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.
  • यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना तातडीचे पत्र पाठवून प्रशासकीय मंजुरीची मागणी केली आहे.
  • वेळेत अग्निशमन वाहन न मिळाल्याने जीवितहानी; जनतेत तीव्र संताप
  • दिनांक ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री येडशी येथील करं डे यांच्या किराणा दुकानाला अचानक भीषण आग लागली.
  • आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, यामध्ये ६ जणां ना आपला जीव गमवावा लागला.
  • या दुर्घटनेच्या वेळी धाराशिव नगरपालिकेकडे स्वतःचे हक्काचे आणि पुरेशा क्षमतेचे अग्निशमन वाहन वेळेत उपलब्ध नव्हते.
  • इतर ठिकाणांवरून अग्निशमन दलाची गाडी मागवण्यात आली, परंतु ती वेळेत घटनास्थळी पोहोचू न शकल्याने बचावकार्यात प्रचंड अडचणी आल्या.
  • वेळेवर मदत न मिळाल्यामुळेच निष्पाप जीवांचा बळी गेल्याची तीव्र भावना आणि संताप स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे.
  • यंत्रणा बळकट करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी
  • भविष्यात अशा प्रकारच्या भीषण आणि वेदनादायी दुर्घट नांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्या तील नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्या साठी धाराशिव नगरपालिका क्षेत्राची अग्निशमन यंत्रणा तातडीने बळकट करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • यासाठी नगरविकास विभाग अथवा जिल्हा नियोजन स मितीच्या (DPDC) माध्यमातून धाराशिव नगरपालिकेला चार अद्ययावत अग्निशमन वाहने (Fire Fighters) खरेदी करण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा आणि या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी खाज दार ओमराजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
  • या गंभीर विषयाची उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि संबंधित विभागाला निर्देश देऊन धाराशिवसाठी अग्निशमन वाहने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, अशी आग्रही विनंतीही त्यांनी केली आहे.
  • ओमराजे निंबाळकर यांच्या या पाठपुराव्यानंतर आता त री शासनाकडून धाराशिवच्या अग्निशमन दलाला हक्का च्या वाहने मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles