
खर्डा अपहरण कट उधळणारे पोलिस हे.कॉ.वाघमोडे यांचा आधुनिक लहुजी सेनेतर्फे सत्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कळंब तालुक्याती ल मौजे खर्डा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीचे धारदार शस्त्राच्या धाकाने अपहरण करून तिला जीवे मारण्याचा कट कळंब पोलिसांनी उधळून लावला.
- या घटनेची माहिती मिळताच आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांनी शिष्टमंडळासह पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
- तसेच, तरुणीचे प्राण वाचवणारे कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमोडे यांचा संघटनेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

- पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला
- खर्डा येथील पीडित तरुणीच्या घरी जाऊन एका तरुणाने व त्याच्या तीन साथीदारांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता.
- या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
- त्यांनी समयसूचकता दाखवत तीन मुख्य आरोपींना अटक केली आणि तरुणीची सुखरूप सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात दिले.
- कठोर कारवाईची मागणी
- घटनेनंतर नगिनाताई कांबळे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत न्याय मिळेपर्यंत पाठीशी राहण्याचा शब्द दिला.
- त्यानंतर त्यांनी कळंब पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा आढावा घेतला.
- यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) व पोलीस निरीक्षक (PI) ठाण्यात उपस्थित नसल्याने कांबळे यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला.
- या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
- ‘मुख्यमंत्री शौर्य पदका’साठी शिफारस करणार
- स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तरुणीचे प्राण वाचवल्या बद्दल आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने हे. कॉ.वाघमोडे यांचा सत्कार करण्यात आला.
- या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ मिळावे, यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वा सन नगिनाताई कांबळे यांनी दिले.

- यावेळी आधुनिक लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणभाऊ क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या जोशिलाताई लोमटे, रा ज्य सल्लागार अजयभाऊ कांबळे, धाराशिव जिल्हाध्यक्ष महेशराव सोनपारखे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनीलभाऊ कांब ळे, बिभीषणभाऊ लोमटे आणि अमोलभाऊ कसबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






