वीट हद्दीत पुणे-परंडा खासगी ट्रॅव्हल्स झाडावर आदळली; बालिकांसह अनेक प्रवासी जखमी

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पुण्याहून परंड्याक डे येणाऱ्या ‘पटेल ट्रॅव्हल्स’ या खासगी प्रवासी बसला कर माळा तालुक्यातील वीट हद्दीत गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.
  • वीट येथून करमाळ्याच्या दिशेने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जा ऊन झाडावर आदळली.
  • या अपघातात दोन लहान मुलींसह महिला व पुरुष प्रवा सी जखमी झाले असून, एका महिलेच्या कंबरेला गंभीर मार लागला आहे.
  • झोपेच्या गुंगीमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
  • प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-परंडा मार्गावर धाव णारी पटेल ट्रॅव्हल्स (क्रमांक MH 01 CR 7400) बुधवा री रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून परंड्याक डे निघाली होती.
  • अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवासी पूर्ण क्षमतेने होते. गुरु वारी पहाटे साडेचारच्या सुमारास बस वीट हद्दीतून करमा ळ्याच्या दिशेने जात असताना चालकाला झोपेची गुंगी आली.
  • त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून बस थेट रस्त्याकडे च्या झाडावर जाऊन आदळली, असे प्रवाशांनी सांगितले.
  • स्थानिक युवकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले
  • या अपघातात पाच ते सहा वर्षांची एक बालिका, १२ ते १३ वर्षांची एक मुलगी, तीन महिला आणि दोन पुरुष अ से प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
  • यातील एका महिलेच्या कंबरेला जोरदार मार लागला असून, इतर प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
  • अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक युवकां नी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमी प्रवा शांना बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली.
  • घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलीस प थक घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णाल यात हलविण्यात आले आहे.
  • खासगी प्रवासातील सुरक्षितता आणि भरपाईचा सवाल
  • या अपघातानंतर प्रवासी आणि नागरिकांमधून खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षिततेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
  • “जर एसटी महामंडळाच्या (लालपरी) गाडीला अपघात झाला, तर प्रवाशांना शासनाकडून तातडीने नुकसान भर पाई आणि उपचाराचा खर्च मिळतो.
  • मात्र, खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्यास प्रवाशांनी भर पाई कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल प्रवाशां मधून उपस्थित होत आहे.
  • खासगी वाहनांच्या वेगावर आणि चालकांच्या कामाच्या तासांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न निर्मा ण झाला असून खासगी वाहनातून प्रवास करावा की ना ही, अशी भीती प्रवाशांमध्ये पसरली आहे.
  • दरम्यान, अपघाताचे नेमके कारण, जखमींची अधिकृत सं ख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • पोलिसांच्या पुढील तपासानंतरच अपघाताचे नेमके कार ण स्पष्ट होणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles