शॉर्टसर्किटमुळे ऐन तोडणीच्या तोंडावर १३ एकर ऊस जळून खाक; परंडा तालुक्यातील शेतकरी संकटात.

  • प्रतिनीधी : फारुख शेख :- तालुक्यात आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिके पाण्याअभावी हातातून गेली आहेत.
  • उपलब्ध पाण्यावर कसाबसा जोपासलेला ऊस वाळू ला गला असतानाच, वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या विजे च्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटनां मध्ये मोठी वाढ झाली आहे.
  • तालुक्यातील खासापुरी नं-२ येथे ऐन तोडणीच्या तोंडावर स्पार्किंगमुळे तब्बल १३ एकरांवरील ऊस जळून खाक झाला.
  • या दुर्घटनेत उसासह ठिबक सिंचन संच आणि इतर शेती साहित्याचे जळून मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुर ते हतबल झाले आहेत.
  • पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
  • तालुक्यात गेल्या दहा दिवसांत विविध गावांमध्ये १०० एकरांहून अधिक ऊस जळाल्याच्या घटना घडल्या आहेत.
  • खासापुरी नं-२ येथील बाधित शेतकऱ्यांमध्ये बाळासाहेब ज्ञानदेव देशमुख (४ एकर), पोपट मोहन देशमुख (४ एकर ), विठ्ठल दिगंबर देशमुख (३ एकर), सदानंद रावसाहेब दे शमुख (१ एकर) आणि गजानन रावसाहेब देशमुख (१ ए कर) या पाच शेतकऱ्यांच्या एकूण १३ एकर उसाचा समावेश आहे.
  • मदत आणि पंचनाम्याचे निर्देश
  • घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते तथा माजी उपसभापती मेघराज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
  • जळालेला ऊस वाया जाऊ नये यासाठी त्यांनी तात्काळ यंत्रणा लावून ऊस तोडणी सुरू करून दिली व संकटग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
  • महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाले असल्याने महावितरण आणि महसूल प्रशासनाने संयुक्त पणे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
  • बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळवून द्या वी, अशा सक्त सूचना मेघराज पाटील यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे दिल्या.
  • दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही दूरध्वनी वरून बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
  • या पाहणीप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धाराशिव जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे, माजी सरपंच नितीन घाडगे, सुजित देशमुख यांच्यासह खासापुरी येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles