दिवाळीनंतर बाजारपेठेत शुकशुकाट; पाऊस नसल्याने भाऊबीज, कार्तिकी खरेदीकडे ग्राहकांची पाठ.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दिवाळीचा सण आ टोपल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत सध्या कमालीचा शुक शुकाट पाहायला मिळत आहे.
  • दरवर्षी दिवाळीनंतर भाऊबीज आणि कार्तिकी एकादशी निमित्त करदोडे व इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजार पेठेत मोठी गर्दी असते.
  • मात्र, यंदा ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने व्यापा ऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
  • पाऊस नसल्याने शेतकरी आणि ग्राहक अडचणीत
  • यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेती उत्पादनावर मोठा प रिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्ण पणे शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही.
  • त्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेला बसला असून, खरेदीचा उत्साह पूर्णपणे मावळल्याचे चित्र दिसत आहे.
  • व्यापाऱ्यांची चिंता वाढली
  • भाऊबीजेच्या खरेदीसाठी आणि करदोडे विक्रीसाठी व्या पाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला होता. परंतु, अपेक्षित ग्राहक नसल्याने दुकानांमध्ये सन्नाटा पसरला आहे.
  • सणासुदीच्या काळातही माल पडून राहिल्याने दुकान दारांचे भांडवल अडकले असून, पुढील आर्थिक नियोजन कसे करावे, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles