
परंडा पोलिसांची धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे टाकून अवैध मद्य जप्त.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-परंडा पोलिसांनी अ वैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गावठी व देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.
- शुक्रवारी (दि. १४ नोव्हेंबर २०२६) करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- पहिली कारवाई भोत्रा येथे:
- भोत्रा (ता. परंडा) गावातील मुख्य चौकात शुक्रवारी सायं काळी ५.५० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.
- या कारवाईत आणा दादा शिंदे (वय ४८, रा. भोत्रा, ता. प रंडा) याच्या ताब्यातून अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले ली १५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
- या मद्याची किंमत अंदाजे १ हजार ६०० रुपये इतकी आहे.
- दुसरी कारवाई परंडा शहरात:
- दुसऱ्या कारवाईत शुक्रवारी दुपारी ३.४० वाजण्याच्या सु मारास परंडा शहरातील माळीगल्ली परिसरात छापा टाकण्यात आला.
- येथे अरुण चांगदेव साडेकर (वय ४२, रा. माळीगल्ली, परं डा) याच्या राहत्या घरातून अवैध विक्रीसाठी ठेवलेला मद्याचा साठा मिळून आला.
- पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे ९६० रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारूच्या १२ सिलबंद बाटल्या जप्त केल्या.
- दोन स्वतंत्र गुन्हे दाखल:
- या दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेले अवैध मद्य पोलिसां नी ताब्यात घेतले आहे.
- दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम ६५(ई) अन्वये परंडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






