शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्याला एस.टी.चालकाकडून बेदम मारहाण; परंडा पोलिसांत गुन्हा दाखल.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शाळा सुटल्यानंतर एस.टी. बसने घरी परतणाऱ्या १४ वर्षीय दिव्यांग शालेय विद्यार्थ्याला एस.टी. बस चालकाने बेदम मारहाण केल्या ची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
  • या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात संबंधित बस चालका विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), बाल न्याय कायदा आणि दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • नेमकी घटना काय?
    म्हैसगाव (ता.माढा, जि.सोलापूर) येथील रहिवासी संतोष शंकर वाघ (वय ४२) यांनी याबाबत परंडा पोलीस ठाण्या त फिर्याद दिली आहे.
  • त्यांचा १४ वर्षीय दिव्यांग मुलगा प्रणय हा रिधोरे (ता. मा ढा) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्ष ण घेत असून, तो दररोज एस.टी. बसने शाळेत ये-जा करतो.
  • दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सु मारास शाळा सुटल्यानंतर प्रणय एस.टी. बसने घरी परत त होता.
  • मौजे नालगाव बस स्थानकाजवळ बस नादुरुस्त झाल्याने तिथे दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी बसमधील शालेय मुलांमध्ये हसी-मजाक आणि गोंधळ सुरू होता.
  • याचा राग आल्याने एस.टी. महामंडळाचा बस चालक धनाजी शिंदे (रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने प्रणयला “तुम्ही गोंधळ का करता?” असे विचारत हाताने गालावर चापटा मारल्या, तसेच त्याचे डोके बसच्या खिडकीवर आपटले.
  • दोन महिन्यांनंतर रीतसर गुन्हा दाखल
  • या घटनेनंतर फिर्यादी संतोष वाघ यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार अर्ज (क्र. ०५/२०२६) दाखल केला होता.
  • या अर्जाच्या प्राथमिक चौकशीअंती फिर्यादीने १७ नोव्हें बर २०२६ रोजी परंडा पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहू न रीतसर तक्रार नोंदवली.
  • पोलिसांची कारवाई
  • परंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्ष क चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी चालक धना जी शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५४०/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
  • त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५ (२), बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा क लम ७५ आणि दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा कलम ९२ (अ), ९२(ड) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
  • या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल झाडे (बक्कल नं. १४६६) आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल राऊत (बक्कल नं. १४७५) हे करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles