
बळी पहाट व युवा मेळावा हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित ‘बळी पहा ट व युवा मेळावा’ मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ६ वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे मान्यवर आणि हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सा हात संपन्न झाला.
- कार्यक्रमाची सुरुवात सम्राट बळीराजाचा सत्य इतिहास सादर करून करण्यात आली. त्यानंतर युवा मेळाव्याला सुरुवात झाली.
- सर्व मान्यवरांना विचारमंचावर निमंत्रित करून कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस सचिन रामाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

- मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
- या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे, सरचिट णीस कृष्णा वणे प्रमुख उद्घाटक जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रशांत महाराज मोरे देहूकर, अशोक महाराज काळे, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष अण्णाभाऊ शेंडगे, कोकणचे गाडगेबाबा मारुती काका जोशी, अखिल आगरी समाज परिषद अध्यक्ष जेडी तांडेल,रायगड जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष शिवराम म्हाबळे, जिजाऊ शैक्ष णिक व सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अँड.म हेंद्र मांडवकर, संघाचे उपाध्यक्ष अँड.अवधूत तोरस्कर, शं करराव म्हसकर, बबन उंडरे, सहचिटणीस प्रमोद खेराडे, रवींद्र कुर्तडकर, माधव कांबळे, संजय उमासरे, कार्यका रिणी सदस्य चंद्रकांत बावकर, मधुकर तोरस्कर, अशोक वालम, कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपिका आग्रे, खजिनदार नीलाक्षी लोंढे, करुणा पाटील, कुणबी विवाह मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर तसेच कुणबी कला मंचाचे दिग्दर्शक सुभाष गोताड आदी मान्यवर उपस्थित होते.
- युवा पिढीने समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव कर ण्याच्या उद्देशाने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
- युवा शिलेदार व युवा साथीदार पुरस्काराने अनंत करंबळे, सिद्धी मोंडे, कै. एकनाथ मांडवकर, मुकुंद नवले, संजय रामाणे, अनंत मालप, रुपेश दुसार, सुरेश मांडवकर, दीप क महाडिक, अनिल वांद्रे, शरद गंभे, मंगेश खैरे, उमेश मो रे, एकनाथ डिंगणकर, सुरेश घडवले, निवृत्ती भोईर, रवींद्र मटकर, सूर्यकांत गावणकर आणि अवंती अवेरे यांना युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- तर युवा प्रेरणा पुरस्काराने भारती वीर यांना, तर जीवनगौ रव पुरस्कार राजाभाऊ कातकर यांना प्रदान करण्यात आला.
- त्यानंतर मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांतून समाजाची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी, युवा पिढीची जबाबदारी आणि सामाजिक परिवर्तनाची गरज यावर वि चार मांडले. अध्यक्षीय समारोप युवाध्यक्ष युवराज संतोष यांच्या भाषणाने झाला.
- यावेळी कुणबी युवा मुंबईचे उपाध्यक्ष मिलिंद चिंबडे, पुनी त खांडेकर, अँड.महेश अंबावले, सहचिटणीस पंकज पाल कर,बारकू बेंडल, अविनाश आग्रे, नितीन भुवड तसेच युवा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, प्रतिनिधी, विविध शा खांचे अध्यक्ष, तालुका युवक मंडळांचे अध्यक्ष, पदाधिका री आणि हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
- “आम्ही कुणब्यांची पाखरं” मधून मनोरंजनातून प्रबोधन
- युवा मेळाव्यानंतर कुणबी कलामंच प्रस्तुत ‘आम्ही कुण ब्यांची पाखरं हा मनोरंजनातून प्रबोधन करणारा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
- कोकणातील कुळ कायदा, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य सेवा, राजकारण, समाजकारण, लोककला, सण-उत्सव आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध विषयांवर या कार्यक्रमातून प्रभावी प्रकाश टाकण्यात आला.
- मनोरंजनाच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडत प्रे क्षकांना विचार करायला लावणारा हा कार्यक्रम उपस्थि तांच्या विशेष पसंतीस उतरला.
- या कार्यक्रमासाठी कलामंचाचे प्रमुख विनेश माटल, सह प्रमुख रुपेश नामये, सूत्रधार उमेश जोशी, संगीत विभागा तील सुरेश गोरीवले, संदेश आंबेकर, नितेश लोखंडे, किर ण कांबळे, मधु कांबळे, चंद्रकांत निंबरे तसेच कलामंचा तील सर्व कलाकार आणि नृत्यकलाकार यांनी प्रचंड मेहनत घेतली. सर्वांच्या सांघिक प्रयत्नांतून हा सांस्कृतिक सोहळा यशस्वी झाला.
- गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेली बळी पहाटची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा यंदाही हजारो समाज बांधवांच्या सहभागाने अधिक बळकट झाली.

- या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे सर्व मान्यवर, पुरस्कारार्थी, हजारोंच्या संख्येने उपस्थित समाज बांधव, कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी, कुणबी म हिला मंडळ,कुणबी विवाह सल्लागार मंडळ, कुणबी कला मंच, कुणबी युवा मुंबईचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, शाखा व तालुका प्रतिनिधी, स्वयंसेवक, देणगीदा र, जाहिरातदार, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रत्य क्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर कर ण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






