सोनारी येथे ३१ जानेवारी रोजी भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-जयवंतराव सावंत प्र तिष्ठान (वाकाव, ता.माढा, जि.सोलापूर) यांच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सो हळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  • हा मंगलमय सोहळा रविवार,दिनांक ३१ जानेवारी २०२७ रोजी दुपारी ०१ वाजून ३१ मिनिटांनी भैरवनाथ शुगर व र्क्स लि., शिवाजीनगर-सोनारी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
  • सामाजिक बांधिलकी जपत समाजातील सर्व घटकांतील तरुण-तरुणींचे विवाह विनाशुल्क आणि आनंदी वातावर णात पार पाडण्याचा उदात्त हेतू सावंत बंधूंचा आहे.
  • या सोहळ्यासाठी विशाल विवाह मंडप उभारण्यात येणार असून, उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी आणि वऱ्हाडी मंड ळींसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
  • या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नववधू-वरांना प्रतिष्ठानच्या वतीने संसारोपयोगी साहित्याची भेट दिली जाणार आहे.
  • यामध्ये वराला सफारी सूट, तर वधूला शालू, मणीमंगळ सूत्र आणि संसारोपयोगी भांडी प्रदान करण्यात येणार आहेत.
  • मागील वर्षांप्रमाणेच यंदाही या सोहळ्याला मराठी व हिं दी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते-अभिनेत्री तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देणार आहेत.
  • विवाह नोंदणीसाठी आवश्यक नियम आणि कागदपत्रे :
  • या सोहळ्यासाठी विवाह नोंदणी पूर्णपणे नि:शुल्क असू न, आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणीसाठी वधूचे वय १८ वर्षे आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
  • अर्जासोबत वधू-वरांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून प्रमाणित शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) जोडणे आवश्यक आहे.
  • समाजातील जास्तीत जास्त गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने विवाह नोंदणी करून सोह ळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन माजी मंत्री व आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत आणि प्रा. शिवाजीराव सावंत यांनी सावंत परिवाराच्या वतीने केले आहे.
  • विवाह नोंदणीसाठी संपर्क क्रमांक :
  • इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा:
  • प्रा.शिवाजीराव सावंत : ८८८८८४०२४८
  • विजयराज जाधव (कार्यालय, माढा) : ९९२२२६३३१०
  • सोमनाथ सूर्यवंशी (सोनारी कारखाना) : ८३८००४५४४९
  • सुधाकर शिंदे (वाशी-शिवशक्ती कारखाना) : ९११२३८२२२२
  • सूरज उंदरे (वाशी-इंदापूर कारखाना) : ९३७०५६८२४६
  • प्रकाश कवडे (तेरणा-ढोकी कारखाना) : ९४०४९५५९१६
  • देवानंद भोसले / पॉसले (लवंगी-मंगळवेढा कारखाना) : ७७७४०६९७६८
  • प्रमोद साळुंखे (राजवी-आलेगाव कारखाना) : ९३०९८६७३७१
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles