बावी येथील आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात ‘अट्रॉसिटी’ कलमे वाढवावीत; मृताच्या मुलाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- तालुक्यातील बावी येथील विलास काशिनाथ भोसले यांच्या आत्महत्या प्रकर णात आरोपींवर तात्काळ ‘अॅट्रॉसिटी’ (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनिय म, १९८९) कायद्यांतर्गत कलमे समाविष्ट करावीत आणि सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी मृताचा मुलगा प्रसाद विलास भोसले यांनी भूम येथील उपविभागीय पो लीस अधिकाऱ्यांकडे (SDPO) एका निवेदनाद्वारे केली आहे.
  • नेमके प्रकरण काय?
  • तक्रारदार प्रसाद भोसले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दि. १८ मे २०२६ रोजी रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास बा वी येथील बाबुराव (बालाजी) मारुती पिंपळे व उमेश रो हिदास राऊत यांनी विलास काशिनाथ भोसले यांच्यावर चोरीचा खोटा आरोप करून त्यांचा बदनामीकारक व्हि डिओ तयार केला.
  • हा व्हिडिओ गावात आणि सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची सार्वजनिक बदनामी व मानसिक छळ करण्यात आला.
  • तसेच हा व्हिडिओ मृताच्या नातेवाईकांना पाठवून कुटुंबा त व गावात वाद निर्माण केले गेले.
  • आत्महत्येपूर्वी व्हिडिओद्वारे मांडली व्यथा
  • सततचा अपमान, खोटे आरोप आणि मानसिक छळाला कंटाळून दि. १८ मे रोजी सायंकाळी ५:५४ वाजण्याच्या सुमारास विलास भोसले यांनी स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला.
  • या व्हिडिओमध्ये त्यांनी आरोपींची नावे घेत, “यांनीच मला फाशी दिली असून यांच्या त्रासाला व खोट्या आरोपांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे,” असे स्पष्ट केले होते.
  • त्यानंतर सायंकाळी ६:५० च्या सुमारास त्यांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
  • प्रमुख मागण्या
  • या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०३३०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८, ३५६, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • मात्र, अद्याप यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमे लाव लेली नाहीत व एकाही आरोपीला अटक झालेली नाही, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
  • त्यामुळे या गुन्ह्यात तात्काळ अॅट्रॉसिटीची कलमे वाढवा वीत, मोबाईल व सोशल मीडियावरील डिजिटल पुरावे जप्त करावेत.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष तपास करावा आणि आ रोपींना तात्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रसाद भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles