
पंढरपूर–शेगाव ‘भक्ती रेल्वे’ मार्गासाठी कृती समितीचा महत्त्वपूर्ण पुढाकार ; केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची कुर्डुवाडीत मध्यरात्री भेट घेऊन केली सविस्तर चर्चा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या प्रस्तावित ‘पंढरपूर ते शेगाव भक्ती रेल्वे मार्गा’साठी कृती समितीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
- या संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदा सजी आठवले यांची कुर्डुवाडी येथे मध्यरात्री १.०० वाज ता भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची माग णी करण्यात आली.

- पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांपासून ते शेगावच्या संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांपर्यंत सर्वांसाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
- प्रस्तावित मार्ग हा पंढरपूर, कुर्डुवाडी, परंडा, भूम, वाशी, मांजरसुंबा, बीड, जालना आणि खामगाव मार्गे शेगाव अ सा असणार आहे.
- रेल्वे सुविधांपासून वंचित राहिलेल्या मराठवाड्यातील आ णि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांना थेट रेल्वे जोडणी मिळेल.
- या भागातील दळणवळण, व्यापार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
- या भेटीदरम्यान प्रामुख्याने कुर्डुवाडी ते मांजरसुंबा आणि पुढील रेल्वे जोडणीची आवश्यकता, स्थानिक जनतेच्या अपेक्षा आणि प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असले ल्या तांत्रिक व प्रशासकीय प्रयत्नांवर सखोल चर्चा झाली.
- यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पक्षभेद विसरून या म हत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी एकजुटीने लढा देण्याचा आ णि पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

- याप्रसंगी उपस्थित मान्यवर :
- या बैठकीस रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमा र बनसोडे, कुर्डुवाडीचे उपनगराध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र उ पाध्यक्ष बापूसाहेब जगताप, कृषी व पशुसंवर्धन सभापती नवनाथ आप्पा जगताप, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, भक्ती रेल्वे मार्ग कृती समितीचे कार्याध्य क्ष संतोष वरळे सर, येणेगावचे सरपंच शहाजी नाईकन वरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे, रिपाइं आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाश बन सोडे, आलीम सर यांच्यासह परिसरातील नागरिक व का र्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






