
परांडा तालुक्यातील जवळा-आसू-लोणी रस्त्यासाठी ३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकरी व नागरिकांतून समाधान.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील दळणवळण आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जवळा-आसू-लोणी या रस्त्याच्या कामासाठी ‘केंद्रीय मार्ग निधी’ (CRF) अंतर्गत तब्बल ३ कोटी २५ ल क्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजी राव सावंत यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश आले आहे.
- या मंजूर निधीतून परंडा तालुक्यातील राज्य महामार्ग ६८ (SH 68) ते लोणी (किमी ६३/६०० ते ७०/६००) या टप्प्यातील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.

- अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती,त्या मुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा साम ना करावा लागत होता.
- या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उ पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या निधीसाठी सात त्याने पाठपुरावा केला होता.
- त्यांच्या या विशेष प्रयत्नांची दखल घेत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.
- या रस्त्याच्या कामामुळे जवळा, आसू, लोणीसह परिसरा तील अनेक गावांतील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारपेठेत नेणे सोयीचे होणार आहे.
- तसेच शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरि कांची वाहतुकीची मोठी गैरसोय कायमची दूर होणार आहे.
- निधी मंजूर झाल्याबद्दल जवळा, आसू व लोणी परिसरा तील ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






