
देवगाव खुर्द येथील अतिक्रमण व जातीय छळाच्या निषेधार्थ २३ नोव्हेंबरपासून परंडा तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील मौजे देवगाव खुर्द येथील मागासवर्गीय कुटुंबांची घरे आ णि गायगोठे पाडून त्या जागेवर अनधिकृतपणे ग्रामपंचा यत व तलाठी कार्यालय बांधल्याचा गंभीर आरोप करण्या त आला आहे.
- याप्रकरणी दोषी शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यां वर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.

- या मागणीसाठी सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- याबाबत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयास सविस्तर निवेदन देण्या त आले आहे.
- निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, देवगाव खुर्द येथील शिवा जी नागनाथ गायकवाड, महादेव रायबा पौळ व चंद्रकांत गणपत कांबळे हे गेल्या ३२ वर्षांपासून आपल्या कुटुंबा सह तेथे वास्तव्यास असून त्यांच्याकडे त्याचे अधिकृत पुरावे आहेत.
- मात्र, गावगुंड आणि काही शासकीय अधिकारी-कर्मचा ऱ्यांनी संगनमत करून त्यांना जातीय त्रास देण्यास सुरुवा त केली आहे.
- संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता या कुटुंबांची राहती घरे आणि जनावरांचे गायगोठे उद्ध्वस्त केले असून, त्या जागेवर ग्रामपंचायत व गाव कामगार तलाठी कार्यालय उभारले आहे.
- या कारवाईत जनावरांचा कडबा व इतर चाऱ्याचे सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
- या अन्यायाविरोधात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशास नाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होऊन नुकसान भरपाई दिली जात नाही.
- तोपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत धरणे आंदोलन सु रूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
- आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

- या निवेदनाच्या प्रती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बाव नकुळे, विभागीय आयुक्त (छत्रपती संभाजीनगर), जिल्हा धिकारी (धाराशिव), जिल्हा पोलीस अधीक्षक, परंडा गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांना पाठवण्यात आल्या आहेत.
- निवेदनावर झोपडपट्टी सुरक्षा दलाचे धाराशिव जिल्हाध्य क्ष राजाभाऊ शिंदे, तालुकाध्यक्ष अतुल सोनवणे, शिवाजी गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






