
परंडा–करमाळा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे उसाच्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहतोय का…?
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा–करमाळा म हामार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ऊस वाह तूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
- सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत असून, विभाग एखा द्या मोठ्या अपघाताची आणि शेतकऱ्यांचा जीव जाण्या ची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

- रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून प्रवास
- परंडा–करमाळा हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, सध्या या मार्गावरून कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात ऊस वाह तूक सुरू आहे.
- मात्र, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- उसाने भरलेल्या अवजड ट्रॉली या खड्ड्यांत आदळून पलटी होण्याचे प्रकार घडत असल्याने वाहनधारक आणि प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
- कारखान्यांची भाव जाहीर करण्यास टाळाटाळ; शेतकरी संभ्रमात
- एकिकडे रस्त्यांचा अडथळा असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून अद्याप उसाचा दर जाहीर झालेला नाही.
- गाळप हंगाम आणि दराबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत.
- शेतात उभा असलेला ऊस वाळून त्याचे वजन आणि सा खर उतारा घटण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
- दुष्काळ आणि खराब रस्त्यांचे दुहेरी संकट
- धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका यंदा तीव्र दुष्काळा च्या झळा सोसत आहे. भीषण पाणीटंचाईवर मात करत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्च करून ऊस पीक जगवले आहे.
- मात्र, आता पीक हातात आल्यानंतर कारखान्यांचा भाव नाही आणि वाहतूक करायची तर रस्ते खराब, अशा दुहेरी कात्रीत बळीराजा सापडला आहे.

- तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी
- सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने परंडा–करमाळा रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्ता वाहतु कीस सुरक्षित करावा.
- तसेच, साखर कारखानदारांनी उसाचा भाव आणि गाळप हंगामाबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
- अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी व नाग रिकांकडून देण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






