
परंडा एस.बी.आय बँकेत कर्मचाऱ्यांचे ‘अतिक्रमण’; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग खातेदारांची मोठी गैरसोय.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेली बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेच्या आवारातच कर्मचाऱ्यांकडून दुचाकी पा र्किंग केले जात असल्याने खातेदारांची मोठी गैरसोय होत आहे.

- सोयीसाठी असलेल्या जागेतच कर्मचाऱ्यांच्या गाड्या उ भ्या राहत असल्याने, ‘ही बँक खातेदारांच्या सेवेसाठी आ हे की कर्मचाऱ्यांच्या पार्किंगसाठी?’ असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
- बेजबाबदार प्रकारामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
- परंडा येथील एसबीआय शाखेत आर्थिक व्यवहारांसाठी दररोज मोठी गर्दी असते.
- यामध्ये पेन्शनधारक, वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग बां धवांचा मोठा समावेश असतो. अनेक ज्येष्ठ नागरिक आ णि दिव्यांगांना चालताना किंवा उभे राहताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
- अशा परिस्थितीत बँकेचा परिसर मोकळा व सुरक्षित अस णे आवश्यक असताना, कर्मचाऱ्यांनीच आवारात दुचाकी लावून ये-जा करण्याचा रस्ता अडवला आहे.
- गर्दीच्या वेळी या वाहनांमधून वाट काढताना वृद्ध आणि अपंग नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून अप घाताचीही भीती निर्माण झाली आहे.
- प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का, अशी चर्चाही सुरू आहे.

- संबंधित शाखाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, कर्मचाऱ्यां च्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी आणि बँकेचा प रिसर खातेदारांसाठी मोकळा करावा, अशी जोरदार माग णी नागरिक व खातेदारांकडून होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






