
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलित करणे भोवले…! परंडा पोलिसांची ६ हॉटेल चालकांवर मोठी कारवाई; स्वतंत्र गुन्हे दाखल.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- सार्वजनिक ठिका णी तसेच रस्त्यालगत हॉटेल व्यवसाय करताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गॅस शेगडीचा वापर करणाऱ्या सहा हॉटेल चालकांविरुद्ध परंडा पोलिसां नी मोठी कारवाई केली आहे.
- मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गॅस शेगडीवर अग्नी प्रज्वलित केल्याप्रकरणी सहा जणांविरु द्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- या कारवाईमुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- ही कारवाई गुरुवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान जवळा ते वालवड रस्त्याव रील ईडा (ता. भूम) परिसरात करण्यात आली.
- पोलिसांना संबंधित हॉटेल चालकांकडून सार्वजनिक सुर क्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणा होत असल्याचे निदर्शनास आले.
- पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई करत सहा हॉटेल चालकांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेल चालक आपल्या हॉटेलमध्ये गॅस शेगडीचा वापर करताना आव श्यक सुरक्षिततेची काळजी घेत नसल्याचे आढळून आले.
- जवळा ते ईडा रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारची योग्य खबरदारी न घेता निष्काळजी पणे गॅस शेगडीवर अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता.
- अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे आग लागण्याची किं वा इतर दुर्घटना घडण्याची शक्यता असून, त्यातून नागरि कांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो.
- या प्रकरणी पोलिसांनी अमोल श्रीहरी भोरे (वय ३५, रा. ई डा), रामराजे चतुर्भुज गुंजाळ (वय ३३, रा. वांगी बु.), यश गणेश कोर्ट (वय १९, रा. अंतरगाव), अशोक मुरलीधर घा डगे (वय ३२, रा. ईडा), सतीश बाबुराव गोरे (वय ५३, रा. अंतरगाव) आणि अजित मारुती गोरे (वय ३०, रा. अंतर गाव, ता. भूम, जि. धाराशिव) या सहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.
- सरकारतर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलि सांनी भारतीय न्याय संहिता कलम २८७ अन्वये सहा स्व तंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
- ठिकाणी गॅस शेगडी किंवा अग्नीचा वापर करताना आव श्यक सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
- दरम्यान, हॉटेल व्यवसाय करताना गॅस सिलिंडर, शेगडी आणि अग्नीचा वापर करताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- निष्काळजीपणामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हॉटेल चालकांनी ग्राहकांच्या तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज आहे.
- या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत असून, या कारवाईमुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचे लक्ष आता सुरक्षेच्या नियमांकडे वेधले गेले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






