परंडा येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई कागदावरच? घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल अद्याप गुलदस्त्यात; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू असतानाच, दुसरी कडे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कार्यपद्धतीवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
  • परंडा शहरात गेल्या महिन्यात मोठ्या गाजावाजात कर ण्यात आलेल्या तपासणीनंतर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात एमएच २५ बी एफ १८०९ (MH 25 BF 1809) या शासकीय वाहना तून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी परं डा शहरात दाखल झाले होते.
  • पथकाने शहरातील विविध हॉटेल्स, बेकरी आणि किराणा दुकानांची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने (सॅम्पल) ताब्यात घेतले होते.
  • या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती.
  • मात्र, या तपासणीला महिना उलटून गेला तरी संबंधित नमुन्यांचे तपासणी अहवाल (रिपोर्ट) अद्याप समोर आलेले नाहीत आणि दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
  • केवळ दिखाव्यासाठी तपासणी करून नमुने नेले जातात का, असा सवाल आता परंडावासीय विचारत आहेत.
  • भेसळखोरांवर कारवाई करण्यात प्रशासन नेमकी टाळा टाळ का करत आहे? या कारवाईला ब्रेक लावण्यामागे कोणाचा राजकीय किंवा आर्थिक वरदहस्त आहे का? असे अनेक संशय आता नागरिकांमधून व्यक्त केले जात आहेत.
  • नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर तात डीने कठोर कारवाई करून, प्रलंबित अहवाल जाहीर करा वेत, अशी जोरदार मागणी शहरातून होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles