ए.टी.एम मधून पैसे काढणं आजपासून महागणार…! मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास किती पैसे द्यावे लागणार..?

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- तुम्ही जर वारंवार ए.टी.एम मधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती जा णून घेणं महत्वाचं असणार आहे. कारण आता आज पासून (१ मे २०२५) एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे.
  • त्यामुळे याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो कारण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम इंटरचेंज फी वाढण्यास मान्यता दिली आहे.
  • त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढणे किंवा तुमच्या बँक अकाउंटमधील शिल्लक तपासणं देखील महागणार आहे.
  • ए.टी.एम मधून पैसे काढण्याच्या शुल्काबाबत नवीन निय म आजपासून लागू करण्यात आले आहेत. आता एटीएम मधून मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास अतिरिक्त २ रुपये द्यावे लागणार आहेत.
  • त्यामुळे याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला याच फटका सहन करावा लागू शकतो.
  • आज १ मे २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमां नु सार, ग्राहकांना आता त्यांची मोफत पैसे काढण्याची मर्या दा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त २ रुपये द्यावे लागतील.
  • तसेच एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मासिक मर्या दा ओलांडल्यानंतर ग्राहकांना एटीएममध्ये २१ रुपयां ऐवजी प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • त्यामुळे वारंवार एटीएममधून पैसे काढताना आता विचार करावा लागणार आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
  • सुधारित एटीएम शुल्क काय आहेत…?
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमांनुसार, मेट्रो शह रांमधील ग्राहक दरमहा फक्त ३ वेळा ए.टी.एम मधून मोफत पैसे काढू शकतात.
  • तसेच नॉन मेट्रो शहरांतील ग्राहक दरमहा ५ वेळा एटीएम मधून मोफत पैसे काढू शकतात.
  • मात्र, यापेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी पुढील प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.
  • तसेच हा नियम एटीएममधून रोख रक्कम काढताना आणि बॅलन्स चेक किंवा मिनी स्टेटमेंटसाठी देखील लागू असणार आहे.
  • दरम्यान, ग्राहकांनी त्यांच्या मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर हे सुधारित शुल्क आकारले जाणार आहेत.
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शिफारशीं नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या सुधारणांचा एक भाग म्हणून एटीएम शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
  • तसेच वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे व्हाईट-लेबल एटी एम ऑपरेटर आणि बँका या वाढीच्या संदर्भात मागणी करत होत्या.
  • बँकांची ही मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्य केली आहे. मात्र, याचा ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles