
अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ शाखा वांद्रे,खार, सांताक्रूझ आयोजित गुणगौरव व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- अखिल महाराष्ट्र कुण बी सेवा संघ शाखा वांद्रे खार सांताक्रुझ तर्फे रविवार दि. १३/०७/२०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजता, सूर्योदय हॉल, गावदेवी वाकोला,सांताक्रूझ पूर्व मुंबई -४०००५५. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विदयार्थी गुणगौरव समारंभ व विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- या कार्यक्रमाला समाजनेते श्री.रवींद्र मटकर, संघसचिव श्री.संतोष जोगले, संघसहसचिव श्री. तुलसीदास नवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
- तसेच शाखेचे पदाधिकारी,कार्यकारणी सदस्य व समाज भगिनी व समाज बांधव तसेच पालकवर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
- शाखेचे अध्यक्ष श्री.नामदेव परवडी,उपाध्यक्ष श्री.रमेश खां डेकर,खजिनदार श्री.दिलीप शिवगण, सहसचिव श्री. मंगे श मळेकर, महिला अध्यक्षा सौ.सुनीताताई चांदिवडे, महि ला सचिव सौ.स्नेहा बावकरताई, संघांच्या माजी अध्यक्षा सौ.लिलावतीताई कातकर,विभागप्रमुख श्री.नारायण मिर जोळकर, तसेच शाखेचे कार्यकारिणी सदस्य श्री.कानू प ळसमकर, धावडेमामा,कातकर मामा,महिला कार्यकारिणी सौ.सुरेखाताई चव्हाण, सौ.मयुरी रावण, सौ. प्रणाली तांबे सौ.भक्ती देवधरे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. विवेक साळवी यांनी केले.

- सर्व मान्यवरांचे सभागृहाला उत्तम मार्गदर्शन लाभले.अध्य क्षीय भाषणात शाखेचा कामकाजासंबंधी माहिती देण्यात आली. अशा रीतीने उत्तमरीतीने हा सोहळा पार पडला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











