
चिखली कन्या शाळेच्या विद्यार्थिनीचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- चिखली (पुणे) येथील पिंप री चिंचवड महानगरपालिका, चिखली कन्या शाळा क्र.९१ येथील विद्यार्थिनी कु. प्रिया विनोद साबळे हिने NMMS (National Means-cum-Merit Scholarship) या महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
- प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर मात करत कु.प्रियाने ओबीसी सवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रा खीव जागेतून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून ति च्या या यशामुळे शाळेसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- NMMS ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना असून, गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्ष णासाठी आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते.
- या परीक्षेत यश मिळवणे हे विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अ भ्यास, मेहनत आणि जिद्दीचे प्रतीक मानले जाते.
- शारीरिक व्यंगावर मात करत कु. प्रियाने या परीक्षेत मिळ वलेले यश तिच्या चिकाटीचे आणि आत्मविश्वासाचे उत्कृ ष्ट उदाहरण ठरले आहे.
- कु.प्रियाच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती वि श्वलता मोरे मॅडम, श्री.आप्पासाहेब पुजारी सर, सौ. उज्ज्व ला चव्हाण मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
- नियमित मार्गदर्शन, सराव आणि वैयक्तिक लक्ष यामुळे प्रियाच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळाली.
- शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री शिंगाडे मॅडम यांनी दिलेले प्रोत्साहन, शैक्षणिक वातावरण तसेच शाळेतील स र्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, आणि ति च्या मैत्रिणी यांचे सकारात्मक पाठबळ हेही या यशाचे महत्त्वाचे घटक ठरले.
- याशिवाय, कु. प्रियाच्या आई-वडिलांचे प्रेम, विश्वास आणि सततचे सहकार्य हे तिच्या यशाचे मुख्य अधिष्ठान राहिले.
- मर्यादित परिस्थितीतही शिक्षणाला प्राधान्य देत, तिला अ भ्यासासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ त्यांनी दिले.
- त्यामुळेच प्रिया आत्मविश्वासाने आणि सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन करू शकली.
- कु.प्रियाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वती ने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.
- या यशामुळे शाळेच्या इतर विद्यार्थिनींनाही प्रेरणा मिळणा र असून, कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचे साथ असल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे पुन्हा एक दा सिद्ध झाले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






