
बावची येथील ऑट्रॉसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी ४० दिवसांनंतर अटकेत; धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा तालुक्यातील बावची येथील बहुचर्चित ऑट्रॉसिटी (दलित अत्याचार प्र तिबंधक कायदा) प्रकरणातील फरार आरोपी रामचंद्र वि क्रम थिटे याला तब्बल ४० दिवसांनंतर पोलिसांनी मुद्देमा लासह अटक केली आहे.
- न्यायालयाने त्याची धाराशिव येथील जिल्हा कारागृहात र वानगी केली असून, या कारवाईमुळे परंडा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांसमोर शरणगु न्ह्याची पार्श्वभूमी: २६ मार्च रोजी दुधी शिवारातील शेतक री उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेतातील पाईपलाईन, बोरवेल व सिंचन साहित्याची आरोपीने तोडफोड केली.
- यात सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच “तु ला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवा चक शिवीगाळ केली.
- याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात ऑट्रॉसिटीचा गुन्हा दा खल करण्यात आला होता.
- अनेक दिवस फरार: गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी रामचंद्र थिटे पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
- न्यायालयाने फेटाळला जामीन: अटकेपासून वाचण्यासा ठी आरोपीने सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालय व त्यानंत र उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.
- मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ४० दिवसांनंतर अटक: अखेर कोणताच मार्ग न उरल्याने आरोपी थिटे ४० दिवसांनंतर गुन्ह्यातील मुद्देमालासह पो लिसांसमोर हजर झाला.
- पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याची धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी कर ण्यात आली आहे.
- पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुकया प्रकरणातील फिर्यादी उमेश सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली होती.
- त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसां नी सखोल तपास करून आरोपीला जेरबंद केले.
- या कारवाईत पोलीस उपअधीक्षक चोरमले, पोलीस निरी क्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिर सट, बीट अंमलदार विश्वास शिंदे, राहुल गायकवाड आणि आडसुळ यांनी परिश्रम घेतले.
- पोलीस प्रशासनाने केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






