
स्वाभिमान दिवसानिमित्त धाराशिव येथे भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि.10 मे 2026 धा राशिव दि. १० : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धे य बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त “स्वाभिमान दिवस” विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
- यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी, धाराशिव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

- या उपक्रमास कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक तसेच हितचिं तकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत सामाजिक बांधिल कीचे दर्शन घडविले.
- या रक्तदान शिबिराची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
- मा.डॉ.धनंजय चाकुरकर (जिल्हा शल्यचिकित्सक, शास कीय रुग्णालय धाराशिव), डॉ. कोरे तसेच आयोजक मा. विकास बनसोडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानं तर रक्तदान उपक्रमास प्रारंभ झाला.
- यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे सामाजिक मह त्त्व अधोरेखित करत, रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले.
- श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे समाजाती ल वंचित, गरजू आणि रुग्णांना मदतीचा हात देणे हीच ख री मानवसेवा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
- रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

- मा.डॉ.धनंजय चाकुरकर, डॉ.कोरे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष मा.धनंजय सोनटक्के, फुले शाहू आंबेडकर विद्वत्त सभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक त था कंथक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आणि आ योजक मा.विकास बनसोडे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमा णपत्र देऊन गौरविण्यात आले.
- या उपक्रमात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा महास चिव विकास गंगावणे, सचिव अक्षय बनसोडे, उपाध्यक्ष नं दकुमार हावळे, वंचित बहुजन आघाडी धाराशिव शहराध्य क्ष आनंद गाडे, उपाध्यक्ष महादेव ऐडके, कामगार आघाडी अध्यक्ष सुधीर वाघमारे, जिल्हा संघटक शेखर बनसोडे, स चिन गायकवाड, संतोष बनसोडे तसेच महिला आघाडी च्या कार्यकर्त्या सौ.अनिता बनसोडे, दिशा दलाल, सपका ळ ताई, रेश्मा बनसोडे, सोनल बनसोडे, लक्ष्मीताई गायक वाड यांच्यासह अशोक कांबळे, सतिश ढगे, आकाश पांडा गळे, यशवंत सपकाळ, महादेव जोगदंड, विनोद बनसोडे, नितीन कांबळे, रोहित बनसोडे आदी कार्यकर्ते व पदाधि कारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रद्धे य प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्या त आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे समाजात मानवता,सा माजिक जबाबदारी आणि सेवाभावाचा संदेश पोहोचल्या ची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






