
परंडा शहरातील सोमवार गल्लीत महावितरणचा भोंगळ कारभार; जमिनीलगत उघड्या मीटर पेटीमुळे अपघाताची भीती.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील सोम वार गल्लीतील कल्याण स्वामी मठासमोर महावितरण कं पनीच्या वतीने वीज ग्राहकांचे मीटर एकाच पेटीत एकत्र बसवण्यात आले आहेत.
- मात्र,ही मीटर पेटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि निष्का ळजीपणे बसवण्यात आल्याने नागरिकांच्या जीवाला मो ठा धोका निर्माण झाला आहे.
- महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे स्थानिक रहिवा सी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- धोक्याची घंटा: जमिनीपासून अवघ्या ३ फुटांवर पेटीसंबं धित विभागाने ही वीज मीटरची पेटी जमिनीपासून अव घ्या तीन ते चार फूट अंतरावर बसवली आहे.

- त्यामुळे लहान मुले, पादचारी किंवा जनावरांचा हात सह जपणे या पेटीला लागू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे, या पेटीला कुलूप लावण्याची व्यवस्था असतानाही ते उघ डेच ठेवण्यात आले आहे.
- पेटीच्या आत वीजवाहक तारा (लाइव्ह वायर) मोकळ्या अवस्थेत सोडलेल्या आहेत.
- पावसाळ्याच्या दिवसांत किंवा गर्दीच्या वेळी येथे मोठी दु र्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरुंद रस्ता आणि वाहतुकीला अडथळासोमवार गल्लीतील हा रस्ता आधीच प्रचंड अरुंद आहे.
- त्यातच ही पेटी अगदी खाली आणि रस्त्याच्या बाजूला अ सल्याने येथून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधार कांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
- वाहनाचा धक्का लागून पेटी तुटल्यास किंवा शॉर्ट सर्किट झाल्यास भीषण अपघात होऊ शकतो.
- नागरिकांची मागणी:पेटी उंचावर हलवाया गंभीर समस्ये कडे महावितरण कंपनीच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
- रस्त्यावरील ही धोकादायक मीटर पेटी विद्युत खांबावर ज मिनीपासून किमान ६ फूट उंचावर बसवण्यात यावी आ णि तिला त्वरित कुलूप ठोकण्यात यावे, अशी मागणी सोमवार गल्लीतील नागरिकांनी केली आहे.
- प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






