
मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अचूक व वेळेत पूर्ण करा: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- निवडणूक आयोगा च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) अभियानांत र्गत सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गुरुवारी (दि. १०) परंडा तालुक्याचा धावता दौरा केला.
- या दौऱ्यादरम्यान त्यांनी मौजे कात्राबाद तसेच परंडा शह रातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन सुरू असलेल्या मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रियेची पाहणी केली.
- दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पुजार यांनी मतदार नोंदणी, पडताळणी आणि माहिती अद्ययावत करण्याच्या प्रक्रिये ची बारकाईने तपासणी केली.

- तसेच क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी व क र्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
- मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अत्यंत अचूक, पारदर्शक आणि निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहित मुदती तच पूर्ण करण्याच्या कडक सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या.
- पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये”तालुक्यातील प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूकपणे झाली पाहिजे.
- कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या.
- तसेच अपात्र किंवा दुबार नोंदींची योग्य पडताळणी करून त्यावर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करा,” असे निर्दे श जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
- अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
- विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानामुळे मतदार याद्या अ द्ययावत व त्रुटीमुक्त होऊन निवडणूक प्रक्रिया अधिक पार दर्शक व विश्वासार्ह होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- या दौऱ्याप्रसंगी भूमच्या उपविभागीय अधिकारी ज्योती चौहान, परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे, परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांसह महसूल व पालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परंडा तालु क्यातील अभियानाच्या आतापर्यंतच्या प्रगतीची माहिती देऊन अहवाल सादर केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






