आषाढी वारीसाठी धावणार ५,५०० विशेष बस गाड्या; शिवसेना-महायुती सरकारकडून वारकऱ्यांसाठी चोख नियोजन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांसाठी शिवसेना-महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
  • यावर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरसाठी तब्ब ल ५,५०० विशेष बस गाड्या सोडण्याचे भव्य नियोजन करण्यात आले आहे.
  • मुख्यमंत्री आणि महायुती सरकारच्या थेट पुढाकारामुळे यंदाचा वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
  • चार भव्य विशेष बस स्थानकांची उभारणीपंढरपूरमध्ये ये णाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळ ण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात ४ तात्पुर ती व सुसज्ज विशेष बस स्थानके उभारण्यात येत आहेत.
  • चंद्रभागा बस स्थानकभीमा बस स्थानकविठ्ठल कारखाना बस स्थानकपांडुरंग(आयटीआय) बस स्थानकवेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेस थेट या नियोजित स्थानकांवर थांबतील, ज्यामुळे भाविकांना त्यांच्या परतीच्या प्रवासा साठी योग्य बस पकडणे सोपे होईल.
  • वाहतूक नियंत्रण आणि चौकशी केंद्रेवारकऱ्यांच्या मदती साठी एसटी महामंडळामार्फत विशेष वाहतूक नियंत्रण कक्ष आणि २४ तास कार्यरत राहणारी चौकशी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.
  • याद्वारे गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग आणि स्थानकांची अचू क माहिती दिली जाईल.
  • वारकऱ्यांच्या सेवेत शिवसेना-महायुती”विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये, ही आमची प्राथमिकता आहे.
  • ५,५०० बसेसचे हे विशेष नियोजन विठ्ठलभक्तांच्या सेवेसा ठी समर्पित आहे,” अशी प्रतिक्रिया महायुती सरकार मधी ल प्रवक्त्यांनी दिली आहे.
  • बस स्थानकांवर पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि स्व च्छतागृहांची देखील विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles