सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत भव्य सत्कार.!

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- दि. २७ जुलै २०२६ पुणे/स्थानिक गाव:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या व तीने आयोजित इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उ ल्लेखनीय यश मिळवून पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यां चा शाळेत मोठ्या उत्साहात गौरव व सत्कार समारंभ संप न्न झाला.
  • या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद सर होते.
  • तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या बनसोडे उपस्थित होते.
  • यावेळी पर्यवेक्षक प्रवीण शेरे सर, उपस्थित पालक व शि क्षक यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना हार आणि पुष्पगु च्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
  • शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले यशस्वी विद्यार्थी व त्यांचे गुण पुढीलप्रमाणे:
  • १) प्रणया विनोद खुने (२४० गुण)
  • २) ओवी हनुमंत पाटील (२४० गुण)
  • ३) अवधूत हनुमंत कवडे (२२० गुण)
  • ४) आराध्या ज्योतीराम घोगरे (२०० गुण)
  • ५) समृद्धी विष्णूदास गोडगे (१६० गुण)
  • ६) सई जितेंद्र पाटील (१५८ गुण)
  • ७) दिव्या नवनाथ पाटील (१४६ गुण)
  • ८) सार्थक गोपाळ मोमले (१४४ गुण)
  • ९) सोहम महादेव लिमकर (१४२ गुण)
  • १०) ईश्वरी इंद्रजीत नरूटे (१४० गुण)
  • ११) परी औदुंबर गाडे (१३६ गुण).
  • ‘जेईई’ व ‘सीईटी’ मधील यशवंतांचा विशेष गौरव: याच कार्यक्रमात शाळेच्या जुन्या विद्यार्थ्यांच्या उच्च यशाची दखल घेत विशेष सत्कार करण्यात आला.
  • यामध्ये प्रथमेश सूर्यवंशी याने ‘जेईई’ (JEE) परीक्षेत ९५.८७ पर्सेंटाईल व ‘सीईटी’ (CET) परीक्षेत ९१.२७ पर्सें टाईल, तसेच करण घोगरे याने ‘जेईई’ परीक्षेत ९२.०० प र्सेंटाईल गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
  • मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक:विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे कठोर परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्श क शिक्षक शकीलाबानू बाळाभाई, किरण ठाणांबीर, प्रवी ण मुडपे, प्रशांत पंडित, विष्णू तोडसाम व गोवर्धन गरड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
  • मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले व इतर विद्यार्थ्यांनीही या यशवंतांचा आदर्श घेऊन प्रगती करावी, असे आवाहन केले.
  • प्रमुख पाहुणे राहुल भैय्या बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना भवि ष्यातही सातत्य ठेवून उच्च ध्येय गाठण्याचा संदेश दिला.
  • कार्यक्रमास हनुमंत कवडे, विष्णूदास गोडगे, घोगरे, औदुं बर गाडे, खुने मॅडम, पाटील मॅडम यांच्यासह मोठ्या संख्ये ने पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचा शेवट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भ वितव्यास शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles