अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी.

  • प्रतिनीधी : स्वरूप गावडे :-भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पा वसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
  • जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी जि ल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय, खासगी, अनुदानि त व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये तसेच सर्व शैक्ष णिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
  • जिल्ह्यात अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता तसेच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • हा निर्णय भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्व भूमीवर घेण्यात आला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles