कंडारीत मंदिर चोरीचा तपास न लागल्याने ग्रामस्थांचे मंदिराच्या शिखरावर चढून दुसऱ्या दिवशीही अन्न-त्याग आंदोलन; एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली….!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कंडारी येथील स्था निक मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लावण्यास पोलीस प्रशासनाला अपयश आल्याने आणि याप्रकरणी प्रथम ख बरी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यास कमालीचा विलंब केल्याच्या निषेधार्थ कंडारी येथील संतप्त नागरि कांनी थेट मंदिराच्या शिखरावर चढून सुरू केलेले आंदोल न आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
  • सध्या परिसरात उन्हाचा तीव्र तडाका असून, जवळपास ३५ अंश सेल्सिअस तापमानात आंदोलक अन्न आणि पाण्याविना उन्हात बसून आहेत.
  • या तीव्र आंदोलनामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून, पोलीस व महसूल प्रशासनाच्या या गंभीर दुर्लक्षा बद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; जीवाला बरे-वाईट झाल्यास पोलीस जबाबदार…!
  • मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी येथील मंदिरात चोरी झाल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.
  • मात्र, पोलिसांनी तातडीने पावले न उचलत एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ व विलंब केला. पोलिसांच्या या सं थ कारभारामुळे हताश झालेल्या नागरिकांनी अखेर मंदि राच्या शिखरावर चढून शोले स्टाईल आंदोलन आणि उपोषण सुरू केले.
  • दोन दिवस उलटूनही महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी आंदोलकांची मनधरणी कर ण्यासाठी किंवा त्यांची सुद घेण्यासाठी पोहोचलेला नाही.
  • “कडक उन्हात अन्न-पाण्याविना बसलेल्या उपोषणकर्त्यां च्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास, त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासनच जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.
  • आंदोलकर्त्यांच्या मुख्य मागण्या:
  • मंदिरात चोरी करणाऱ्या चोरांचा तात्काळ शोध घेऊन चोरीचा तपास लावण्यात यावा.
  • एफआयआर (FIR) नोंदवण्यास जाणीवपूर्वक विलंब ला वणाऱ्या संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर व कर्मचा ऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  • दरम्यान, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून, जो पर्यंत ठोस कारवाईचे आश्वासन आणि चोरांना पकडण्या साठी पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत शिखरावरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
  • संवेदनशील परिस्थितीमुळे गावात तणावपूर्ण शांतता असू न, प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles