
नवरात्रौत्सवात आडिवरेतील महाकाली मंदिरात १५ ऑक्टोबरला आई जाखादेवी कलामंच मुंबई (भालावलीचे) नमन.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील प्रसि द्ध असलेल्या आडिवरे येथील महाकाली मंदिरात प्रतिव र्षाप्रमाणे यंदाही रविवार दि. १८ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भव्य नवरात्रौत्सव उत्सव साजरा करण्या त येणार आहे.
- श्री महाकाली देवस्थानच्या वतीने दररोज मनोरंजनाच्या कार्यक्रम आयोजन केले आहे.
- गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी राजापूरसह संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या श्री आई जाखादेवी कलामंच मुंबई (भालावली) यांच्या लोकप्रिय नमनाचा कार्यक्रम होणार आहे.

- कलामंचच्या कार्यक्रमाची यंदाच्या मोसमातील सुरुवातच श्री आई महाकालीच्या आशिर्वादाने होणार आहे.
- सदर नमनातील सर्वच कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर असून हे नमन पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक दूरवरून येत असतात अगदी शंभर टक्के मनोरंजन आणि पारंपरिक वगाची प्रचिती देणाऱ्या या नमनाच्या कार्यक्रमासाठी ८६५५५३६४५७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे विनंती श्री आई जाखादेवी कलामंच मुंबई भालावलीतर्फे करण्यात आली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






