येडशीत भीषण अग्नितांडव: एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून व गुदमरून मृत्यू; दिवाळीच्या रात्री काळाचा घाला;येडशी आग्नदुर्घटनची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करा : आ.डॉ.प्रतापसिंह पाटील

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-धाराशिव जिल्ह्याती ल येडशी येथे दिवाळीच्या सणादरम्यान काळीज पिळवटू न टाकणारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
  • रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका किराणा दुका नाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तब्ब ल सहा जणांचा मृत्यू झाला.
  • या अग्नितांडवात संपूर्ण करंडे कुटुंब उद्ध्वस्त झाले असू न, ऐन दिवाळीच्या आनंदावर दुःखाचे मोठे सावट पसरले आहे.
  • मृतांमध्ये उत्तम त्रिंबक करंडे,चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, चिमुकली गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे यांचा समावेश झाला आहे.
  • दुर्घटनेत कुटुंबातील कृष्णा नावाची व्यक्ती असून, तिच्याव र रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • मध्यरात्री आगीचे रौद्ररूप
  • मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, येडशी येथील गोविंद भाऊ करंडे आणि उत्तम करंडे यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानाच्या वरच्या मजल्यावरच करंडे कुटुंब वास्तव्या स होते.
  • सर्वजण गाढ झोपेत असताना ही आग लागल्याने, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातील साहि त्यासह वरच्या मजल्यावरील घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
  • या दुर्घटनेत घरात अडकलेल्या सात जणांपैकी दोघांचा होरपळून, तर चौघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
  • अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
  • घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहून धाराशिव, कळंब आणि तुळजापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
  • आग आटोक्यात आणण्यासाठी आणि घरात अडकलेल्यां ना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
  • मात्र, तोपर्यंत सहा जणांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला होता. ही आग घरात लावलेल्या पणतीमुळे लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
  • लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव
  • या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच खासदार ओम
  • राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार कैलास पाटील यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेतली.
  • त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रशासकीय अधिका ऱ्यांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली व करंडे परि वाराला धीर दिला.
  • बाजारपेठ बंद; येडशी गावावर शोककळा
  • ऐन दिवाळीच्या सणात एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
  • करंडे कुटुंबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी व दुःख व्यक्त करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज येडशीची संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवली.
  • सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता येडशी येथी ल सार्वजनिक स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावर णात सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles