हैदराबाद-सोलापूर महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२८ किलो गांजासह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना बेड्या

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- जिल्ह्यात अंमली प दार्थ तस्करीविरोधात धाराशिव पोलिसांनी अत्यंत मोठी आणि यशस्वी मोहीम फत्ते केली आहे.
  • हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग पोलिसां च्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका संशयास्पद आयशर ट्रकला थरारक पाठलाग करून पकडले.
  • या वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये लप वून ठेवलेला तब्बल १२८ किलो ३८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
  • या कारवाईत पोलिसांनी गांजा आणि आयशर ट्रक मिळून एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत के ला असून, सोलापूर जिल्ह्यातील दोन तस्करांना रंगेहात अटक केली आहे.
  • कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळाली संशयास्पद गाडी
  • मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहा य्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक महामार्गावर ‘कोंबिंग ऑपरेशन’ व गस्त घालत होते.
  • उमरगा ते नळदुर्ग मार्गावरून जात असताना एक आयशर वाहन (क्रमांक MH 45 AX 9456) संशयास्पदरीत्या अतिशय वेगाने जाताना पोलिसांना दिसले.
  • पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जळकोटजवळील ‘हॉ टेल निरंजन’ समोर या वाहनाचा पाठलाग करून ते थांबवले.
  • ६३ पाकिटांमध्ये दडवला होता ६४ लाखांचा गांजा
  • पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात लपवून ठेवलेली गांजाची ६३ मोठी पाकिटे आढळून आली.
  • वजन केले असता हा गांजा १२८ किलो ३८० ग्रॅम भरला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल ६४ लाख १९ हजार रुपये आहे.
  • वाहतुकीसाठी वापरलेला १६ लाख रुपयांचा आयशर ट्र कही पोलिसांनी जप्त केला. या संपूर्ण कारवाईत एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
  • सोलापूरच्या दोघांना अटक, आंतरराज्य टोळीची शक्यता
  • या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक आकाश साहेबराव दांगट (वय २९ वर्ष) आणि सागर महादेव जाधव (वय ३५ वर्ष, दोघेही रा.आनंद नगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
  • आरोपींवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDP S) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्या यालयाने त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुना वली आहे.
  • या मोठ्या तस्करीच्या मागे एखादी आंतरराज्य टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी
  • ही मोठी आणि धडाकेबाज कामगिरी धाराशिवच्या जि ल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखा ली करण्यात आली.
  • स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात सपोनी सुदर्शन कासार, पोलीस हवालदार गादेकर (बकल नंबर १४३१),मुज्जू पठाण (बकल नंबर १२७५),पोलीस नाईक अशोक ढगारे(बकल नंबर १६३१) तसेच चालक पोलीस हवालदार चौरे आणि गुरव यांनी अत्यंत धाडसाने ही कारवाई पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles