विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत ‘कोकण कट्टा’ ने केली दिवाळी साजरी.

  • प्रतिनीधी : विलेपार्ले : प्रमोद तरळ :- दिवाळीचा पहि ला दिवस हा आनंदाचा, प्रकाशाचा दिवस. पण कोकण कट्टा परिवारासाठी हा दिवस म्हणजे सेवेचा दिवस. गेली ११ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या परंपरेनुसार यंदाही दिवाळीच्या पहिल्या दिवशी विलेपार्ले-अंधेरी येथील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचारी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.
  • यावेळी कर्मचारी बांधवांना दिवाळी फराळ व भेटवस्तू दे ऊन त्यांच्या सोबत आनंद साजरा करण्यात आला.
  • रोज आपला आनंद बाजूला ठेवून अनेकांच्या दुःखात सह भागी होणारे, समाजाच्या शेवटच्या कार्यात निष्ठेने सेवा दे णारे हे बांधव खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत.
  • त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना भेट देऊन कर्तव्य ब जावणे, हाच या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी सांगितले.
  • या कार्यक्रमाला स्मशानभूमीतील असावरे, तेंडुलकर व स र्व कर्मचारी बांधव आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या चेह ऱ्यावरील आनंद हाच कोकण कट्टासाठी खरा दिवाळीचा दिवा ठरला.
  • यावेळी कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे, दादा गा वडे, सुजित कदम, प्रथमेश पवार, दया मांडवकर, निशिकां त मोरे, सचिन दिवाळे, देऊ डामरे, मधू हेगडे संतोष तोडण कर, मनिष माईन आदी सदस्य उपस्थित होते.
  • “सेवार्थ उपक्रमासाठी चळवळ” या ब्रीदवाक्याखाली को कण कट्टाचे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर सुरू असतात.
  • दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा हा उपक्रम पुढील वर्षीही असाच सुरू राहील, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles