धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार ‘लाल दिवा’? मंत्रिपद विस्तार चर्चांना उधाण; आ. तानाजीराव सावंतांच्या नावाची जोरदार चर्चा….!

  • प्रतिनिधी : परडा : फारूख शेख :- राज्याच्या मंत्रिमंड ळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असतानाच, धारा शिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
  • जिल्ह्याला पुन्हा एकदा ‘लाल दिवा’ (मंत्रिपद) मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, भूम-परंडा-वाशी विधा नसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात रंग ली आहे.
  • जिल्ह्याच्या विकासाला मिळणार चालना
  • धाराशिव जिल्ह्याला यापूर्वी मंत्रिपद मिळाल्याने सिंचन, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या अनेक प्रलंबित प्रश्नां ना गती मिळाली होती.
  • विशेषतः कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि मतदार संघातील विकासकामांसाठी निधी खेचून आणण्यात प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • त्यामुळे जिल्ह्याला पुन्हा मंत्रिपद मिळाल्यास प्रलंबित वि कासकामांना मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
  • भूम-परंडा-वाशी मतदारसंघात आनंदाचे वातावरण
  • मंत्रिमंडळ विस्तारात तानाजीराव सावंत यांची वर्णी लाग णार असल्याच्या चर्चांमुळे भूम, परंडा आणि वाशी या ति न्ही तालुक्यांतील शिवसैनिक आणि समर्थकांमध्ये उत्सा हाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांकडून या शक्यतेचे स्वागत केले जात असून, साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळा ल्यास जिल्ह्याचे पालकत्व आणि विकास अधिक भक्कम होईल, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
  • वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग
  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि म राठवाड्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता, महायुती च्या वरिष्ठ नेत्यांकडून धाराशिव जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
  • आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तारात कोणाच्या गळ्यात मं त्रिपदाची माळ पडते आणि धाराशिवचा ‘लाल दिवा’ पुन्हा केव्हा झळकतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles