परंड्यात मित्राला वापरण्यास दिलेली २ लाख १० हजारांची चारचाकी गाडी चोरीला…..!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- मित्राला विश्वासाने वापरण्यासाठी दिलेली तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीची चारचाकी गाडी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना परंडा शहरात उघडकीस आली आहे.
  • प्रकरणी कारी येथील सुरज नेताजी जेधे आणि त्याच्या अ न्य एका साथीदाराविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश सुदर्शन टिळेकर (वय ३७, रा.हडपसर, ता.हवेली,जि.पुणे) यांनी आपली चारचाकी गाडी मित्राला वापरण्यासाठी दिली होती.
  • १२ एक्सएक्स ९१८६ क्रमांकाची आणि अंदाजे २ लाख १० हजार रुपये किमतीची ही गाडी दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हमीर फरीद सय्यद यांच्या घरासमोर उभी होती.
  • याचवेळी आरोपी सुरज नेताजी जेधे (वय २५, रा. कारी) व त्याच्या अन्य एका साथीदाराने संगनमत करून सदर चारचाकी गाडी चोरून नेल्याची फिर्याद महेश टिळेकर यांनी परंडा पोलिसांत दिली आहे.
  • या प्रकरणी दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिते च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • विश्वासाने वापरण्यास दिलेल्या वाहनाचीच चोरी झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचा पुढी ल तपास परंडा पोलीस करीत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles