
मॉडर्न शिशुविद्यामंदिरात देशभक्तांवरील प्रकल्पाचे प्रदर्शन उत्साहात.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलात शिशु विभागातील शिक्षकांनी पालक व विदयार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्र पती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा ज्योतीबा व सावित्रिबाई फुले,विवेकानंद आणि लोकमान्य टिळक इ.यांचे कार्य व महिती प्रत्यक्ष प्रकल्प मांडून दाख विले. प्रकल्प पहाण्यासाठी ३०० पालक व विदयार्थी आले होते.

- छोटया छोटया विदयार्थ्यांनी प्रकल्पाची माहिती,पोवाडा गायन,गोष्टी सांगून पालकांची वाहवा मिळवली.
- या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना थोर नेते समाज सुधार कांची छान माहिती मिळाली. कार्यक्रमाचे उद्घाटन शैला सुरेश शिंदे – महिला पोलीस अंमलदार यांच्या हस्ते झाले.
- शाळा समिती अध्यक्षा अमिता किराड,व्हिजिटर सतीश लिंबेकर,मुख्याध्यापिका संगीता घुले,पांडूरंग मराडे, तृप्ती वंजारे,शारदा साबळे पालक संघ उपाध्यक्षा व्हरकट सुप्रि या यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

- पाहुण्यांनी मुलांचे खूप कौतुक केले व शिक्षकांनाही शाब सकीची थाप दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा कुलकर्णी यांनी केले.
- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले.

- मुख्याध्यापिका संगीता घुले,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्म चारी व पालकांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











