महावितरण सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात ठसा उमटवणारी रूपाली बाचिम.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर :  प्रमोद तरळ :- नोकरीची काही क्षेत्रे परंपरागतपणे पुरुषप्रधान समजली जातात. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे महावितरण.
  • पण या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडत स्वत:चे स्थान नि र्माण करणारी आधुनिक नवदुर्गा म्हणजे करजुवे गावाची रूपाली बाचिम.
  • करजुवे गाव हे दुर्गम गावं म्हणून समजले जाते.ह्या गावात दोन बहिणी आणि एक भावासह शिकून लहानाची मोठी झालेली रूपाली हीने महिलांना काहीसे अपरिचित असले ले आय.टी.आय हे क्षेत्र पुढील शिक्षणासाठी निवडले.
  • शेती हा पारंपारिक उद्योग असलेले बाचिम कुटुंबियात रू पालीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवल्यावर आईने शेती सांभाळत चार आपत्यांना वाढवले.
  • ह्या चारांपैकी तिसरी रूपाली. घराची परिस्थिती समोर ब घत असताना बारावीनंतर काय या प्रश्नाला चुलते मंगेश कांगाणे आणि अन्य एका नातेवाइकांनी आय.टी.आय करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी इलेक्ट्रिशियन हा मार्ग दाखवला.
  • प्रत्यक्षात ही वाट रूपालीसाठी वाटली तितकी सोपी नव्ह ती. संगमेश्वर येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्यावर लक्षात आले की इलेक्ट्रिशियनच्या कोर्सला अवघ्या चार मुली आहेत.
  • पण त्याही परिस्थितील करजुवे ते संगमेश्वर असा प्रवास दोन वर्षे करत तिने तो कोर्स ७१ टक्के गुण मिळवत पूर्ण केला.
  • कोर्स पूर्ण झाल्यावर आरवली येथे वर्षभर कंत्राटी कर्मचा री म्हणून काम केले आणि अनुभव मिळवला.
  • त्यानंतर शहरात जाण्याचा विचार सुरू असतानाच महावि तरण मध्ये विद्युत सहाय्यक ह्या पदासाठीची जाहिरात रूपालीला समजली आणि तिने ऑनलाइन अर्ज केला.
  • त्यानुसार आरवली कार्यालयातच तिची विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्ती करण्यात आली.
  • २०२१ पासून रूपाली आरवली महावितरण अंतर्गत येणा र्‍या धामापूरतर्फे संगमेश्वर ह्या गावात कार्यरत आहे.
  • महावितरणची बिले वसूल करणे, मीटर बसवणे, फ्यूज ब दलणे अशी कामे ती करतेच पण पोलवर चढून पोलवरचे फॉल्ट काढणे, महावितरणच्या तारा ओढणे, एकमेकांना चिकटलेल्या तारा सोडवणे ही कामेही ती लीलया करते.
  • या कामात तिला अधिकारी अमोल म्हस्के आणि लाईनम न संदेश पारधी यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्या चे सांगते.
  • आपल्या कामामुळे रूपाली परिसरात खूप लोकप्रिय झा ली आहे. वेळ आली की तातडीने धावून जाणे, रात्री अप रात्री,अडीअडचणीच्या ठिकाणी जावून काम करत ती ग्रामस्थांच्या समस्या सोडवते, अस्या या रुपाली बाचीम या नवं दुर्गेचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles