
मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यमात विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- यमुनानगर निगडी येथील इंग्रजी माध्यमाच्या मॉडर्न हायस्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
- यावेळी इशरेचे चेतन ठाकूर,प्रेसिडेंट अरुण चिंचोरे, फार्म सी कॉलेजचे डॉ.प्रवीण चौधरी,व्हिजिटर डॉ.अतुल फाटक , मुख्याध्यापिका गौरी सावंत उपस्थित होत्या.

- या प्रदर्शनात भाषेचे व्याकरण,सायन्स प्रोजेक्ट आर्ट अँड क्राफ्ट,गणित,समाजशास्त्र, संगणक अशा विविध विषयां चे आकर्षक प्रकल्प मांडण्यात आले होते.
- विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मॉडेल,चार्ट,प्रयोग, हस्त कला वस्तू यांनी परिसर विज्ञानमय झाला होता.
- विज्ञान विभागातील सौर ऊर्जा,न्यूक्लिअर ऊर्जा, रोबोट, जलशुद्धीकरण, ज्वालामुखी,भारताची भूरचना,लोकशाही, गणिताची प्रमेय, कोनाचे प्रकार, मराठीतील व्याकरणाचे विविध प्रोजेक्ट, आर्ट अँड क्राफ्ट यासारखी प्रात्यक्षिके विशेष आकर्षक ठरली.

- आर्ट अँड क्राफ्ट मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे उत्तम दर्श न झाले.
- यावेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे आणि कल्पकतेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो असे मत इश्रेचे प्रेसिडेंट चेतन ठाकूर म्हणाले.
- फार्मसीचे प्राचार्य डॉ.प्रवीण चौधरी यांनी आपल्या भाष णात ओला,उबेर,मेट्रो,स्वीगी अशी उदाहरणे देऊन कल्पना शक्तींना चालना दिली.
- या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता गाडे, पाहुण्यांचा परिच य दीपा वायकोळे, आभार प्रदर्शन सोनाली गावकर यांनी केले.

- शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यां च्या मदतीने हा सोहळा आनंदाने पार पडला.
- संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा.डॉ.जोत्स्ना एकबोटे,सेक्रेटरी प्रा.शामकांत देशमुख, शा ळा समितीचे अध्यक्ष दीपक मराठे, व्हिजिटर डॉ.अतुल फाटक यांनी मुलांचे कौतुक केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











