राजापूर तालुक्यात भाजपातून बंडखोरीची पहिली ठिणगी; रायपाटणच्या माजी सरपंचांचा पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पूर्व विभागात रायपाटण ग्रामपंचायत भाजपकडे आहे. तसेच रायपाटण प.स. गणात सौंदळ व अन्य ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भाजपचे प्राबल्य आहे.
  • श्री.संदीप कोलते हे उच्च शिक्षित उमेदवार असून दहा व र्ष रायपाटण ग्रामपंचायतीचे सरपंच होते. श्री.संदीप कोल ते भाजप कार्यकर्ते असून पक्षीय राजकारण व्यतिरिक्त त्यांचा सर्वसामान्य जनतेत उत्तम जनसंपर्क आहे.
  • श्री. संदीप कोलते जिजामाता विद्यामंदिर रायपाटण येथे लिपिक असून स्वच्छ चारित्र्य असल्याची प्रतिमा जनतेम ध्ये आहे आणि प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असून जानेतेचे प्रश्न सोडविण्याचे उत्तम कौशल्य आहे, भा जपकडून अधिकृत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.
  • परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपला सदर जागा मिळण्याची शक्यता नसल्याने श्री.कोलते यांनी अपक्ष उमे दवारी अर्ज दाखल करुन निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
  • भाजपची तालुक्यात ताकद वाढवायची असेल तर प. स. व जि.प.मध्ये लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली च पाहिजे, असं मत त्यांनी मांडल आहे.
  • दोन दिवसापूर्वी त्यांनी खासदार आदरणीय श्री.नारायण राणे यांची कणकवली निवासस्थानी राजापूर तालुक्याती ल भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन सर्व परिस्थिती सांगितली आहे.
  • श्री.संदीप कोलते यांनी पंचायत समिती निवडणूक लढव त असल्याने संपूर्ण रायपाटणसहीत प.स.गणात उत्साहा चे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यासोबत प्रचारासा ठी सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या ताकदीने उतरणार अस ल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles