
बावाची विद्यालय परंडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- बावाची विद्यालय, परंडा येथे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
- विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी वेदांत कल्याण जाधव याने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत 300 पैकी 262 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून त्याची सैनिक स्कूल, सातारा येथे निवड झाली आहे.

- तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत खालील विद्यार्थ्यां नी उज्ज्वल यश संपादन केले :
- सदिच्छा प्रदीप काळे(96.25%),आध्या हनुमंत मार्तंडे (90%), सार्थक हनुमंत भोगील (88.75%), युवराज सं तोष बुलबुले (86.25%), दानिश नजेम शेख (85%), अ वंती राहुल गवळी (85%), माधुरी सुनील पाटील (85%), रणजित प्रकाश सोनवणे (83.75%), आर्यन माधव तिड के (83.75%),इनामदार फसिओदीन फयाज (82.50%) , करण भालचंद्र खैरे (81.25%), अनुराग अभय कुलक र्णी (81.25%), मोहम्मद नवाज मुदस्सर शेख (80%), वेदांत कल्याण जाधव (80%), अतिफ इरफान पठाण (80%), राजवर्धन गणेश कुकडे-(83.75%),आयुष विज यकुमार माळी-(85%),राजवर्धन राहुल अंधारे -(80%), भार्गवी महेश शिंदे-(86.25%),अथर्व महेश नलवडे (90%)
- वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नारायण खैरे सर व शिक्षकवृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- तसेच संस्थेचे संस्थापक श्री. बिभिषण रोडगे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- या यशामध्ये विद्यालयातील शिक्षक श्री.संदीप अनभुले सर, श्री.सचिन लावंड सर, श्री. सुरज वळवी सर, यमुना सायकर मॅडम तसेच इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











