वसई-विरारमध्ये कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.

  • प्रतिनिधी : विरार :नितीन राणे :- पालघर जिल्हा मुख्य प्रतिनिधी नागरिकांना आपल्या कायदेशीर हक्कांची जा णीव व्हावी आणि विविध जनहितकारी कायद्यांचा प्रभावी पणे वापर करता यावा, या उद्देशाने माहिती अधिकार का र्यकर्ता फेडरेशन (वसई-विरार शहर जिल्हा) यांच्या वतीने एका भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • ‘कायदेविषयक जनजागृती व एकदिवसीय प्रशिक्षण कार्य शाळा – २०२६’ येत्या रविवारी विरारमध्ये पार पडणार आहे.
  • कार्यशाळेचा तपशील:
  • दिनांक : रविवार, २९ मार्च २०२६
  •  वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.००
  • स्थळ : ठकीबाई गार्डन हॉल, जीवदानी आर. जे. बायपास रोड, विरार (पूर्व).
  • प्रमुख मार्गदर्शक आणि मान्यवर :
  • या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शन फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाषजी बसवेकर करणार आहेत.
  • याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण परीक्षेत्र अध्यक्ष श्री.विजय खेतले (पत्रकार), अखिल भारतीय ग्राहक पंचा यतीचे संघटक श्री.राजेंद्र किसान बंडगर, मुंबई जिल्हा अ ध्यक्ष श्री.दीपक पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. अशोक पडवळ, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. दयानंद उल्मीक आणि भिवंडी अध्यक्ष श्री. शांताराम पाटील आदी मान्यव र उपस्थित राहणार आहेत.
  • प्रशिक्षणाचे मुख्य विषय:
  • कार्यशाळेत तज्ज्ञांमार्फत खालील कायद्यांवर सविस्तर मा र्गदर्शन व अर्ज करण्याची प्रक्रिया शिकवली जाईल:
  • माहितीचा अधिकार कायदा (२००५): सविस्तर विश्लेषण (कलम १ ते ३१).
  • ग्राहक संरक्षण कायदा (२०१९): ग्राहकांचे हक्क आणि तक्रार निवारण.
  • अभिलेख जतन कायदा (१९९३) व दप्तर दिरंगाई कायदा (२००५): सरकारी दप्तर आणि नोंदींबाबतचे नियम.
  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (२०१५): सरकारी सेवा वेळेत मिळवण्याचा अधिकार.
  • उद्देश: प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि सामान्य नागरिकांनी आपले अधिकार प्रभावीपणे कसे वापरावेत, याचे तंत्र या कार्यशाळेत शिकवले जाणार आहे.
  • जास्तीत जास्त सजग नागरिकांनी आणि माहिती अधिका र कार्यकर्त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन व सई-विरार शहर जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने करण्या त आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles