
बार्शीत पत्नीवर चाकूने सपासप वार ; खून करून सैतान पती पोलिसात हजर.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :-बार्शी शहराजवळील बार्शी-परंडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने बार्शी हादरली आहे. ऋषिकेश पाटील याने आप ल्या पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली आहे.
- पत्नीची हत्या केल्यानंतर पती ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. चारित्र्या चा संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दिवसभर गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू होती. भर रस्त्यात, पत्नीची अशी नि र्घुण हत्या केल्याने संपूर्ण बार्शी शहर हादरले आहे.
- भर रस्त्यात पन्नास वार केले, त्यानंतर रस्त्यावरच गळा चि रला. ऋषिकेश पाटील याने पत्नी सोबत अनेक महिने संसार केला, मात्र गळा चिरताना थोडीही दया केली नाही.
- बार्शी परंडा मार्गावर या जा करणाऱ्या लोकांनी लांबून सो डविण्याचा प्रयत्न केला, डोक्यात सैतान घुसलेल्या पतीने पत्नीचा जीव जाई पर्यंत वार करत राहिला आणि गळा चिरला. दोघेही पती पत्नी उच्च शिक्षित आहेत. दोघेही वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत.
- पती ऋषिकेश पाटील आणि पत्नी धनश्री पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून मध्ये वाद झाला होता. वाद विवा द होताना अनेकदा ऋषिकेश पाटील याने धनश्रीला मार हाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
- परंतु मागील दोन दिवसांपासून वाद चिघळले होते. सोम वारी धनश्री पाटील ही नेहमीप्रमाणे बँकेकडे निघाल्या होत्या.
- पण वाटेत मृत्यू पतीच्या वेशभूषेत वाट पाहत होता.बार्शी परांडा मार्गावर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्री वर चाकूने सुमारे ५० वार केले. धनश्री रक्ताच्या थारोळ्या त पडली , शेवटी ऋषीकेश ने गळा चिरला.
- बार्शी-परंडा रोडवर ऋषिकेश ज्यावेळी धनश्रीवर वार करत होता.
- त्यावेळी थरारक दृश्य पाहून काही लोकांनी पळ काढला तर रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
- डोक्यात सैतान घुसलेल्या राक्षस पतीनं मात्र नागरिकांना धमकावत मागे हटवले.धनश्रीने जाग्यावरच जीव सोडला. दोघांनी काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता.
- प्रेम विवाहाचा असा दुर्दैव अंत झाल्याने बार्शी सह सोला पूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






